भिवंडी (वार्ताहर) : भारताचे माजी उपपंतप्रधान; तसेच दलित समाजाचे ज्येष्ठ नेते बाबू जगजीवनराम यांच्या ११८व्या जयंतीनिमित्त भिवंडीत विविध कार्यक्रम घेण्यात आले. राष्ट्रसंत रविदास समाज प्रबोधन मंडळ महाराष्ट्र आणि पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाजोन्नती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. पुष्पलता जाधव सभागृहात रविवारी हा कार्यक्रम झाला.
संस्थाध्यक्ष विजय जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात ‘भारतरत्न से वंचित युगपुरुष, दलितों के मसीहा बाबू जगजीवनराम’ या विषयावर परिसंवाद झाल. यात विविध मान्यवरांनी सहभाग घेत आपले विचार मांडले. या वेळी बाबू जगजीवनराम ट्रस्ट, नवी दिल्लीचे विश्वस्त जितेंद्र खैरे, भगवान रविदास कम्युनिटीज फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. डॉ. राजू रोझोदकर, काँग्रेस इंटक उपाध्यक्ष लक्ष्मण घुमरे, चर्मकार ऐक्य परिषद महाराष्ट्र राज्य अध्यक्ष संजय खामकर, आझाद समाज पार्टी (कांशीराम) महाराष्ट्र महासचिव संजय थोरात; तसेच संत ककैया विकास संस्थेचे सचिव राजेश खंदारे यांनी मार्गदर्शन केले. ॲड. दिलीप वाळंज यांनी बाबू जगजीवनराम यांच्या कार्याचा आढावा घेतला. स्वागताध्यक्ष प्रा. डॉ. नितीन भारस्कर यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.