मुंबई

बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार

CD

मुरबाड, ता. ५ (वार्ताहर) : तालुक्यातील कोरावळे गावाच्या हद्दीत दत्तात्रेय खाटेघरे यांच्या शेतावरील बेड्यावर बिबट्याने हल्ला करून वासरू ठार केल्याची घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली. या घटनेमुळे कोरावळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच सरळगाव परिमंडळातील वन विभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यामध्ये वनपाल टी. एन. भांगरे, वनरक्षक ए. बी. घोलप, के. एस. मस्के आणि एल. आर. रहाडे यांनी परिस्थितीची पाहणी केली. दत्तात्रेय यांच्या शेतातील बेड्यावर असलेल्या वासरावर हिंस्र प्राण्याने हल्ला केल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्षस्थळी पंचनामा करून संबंधितांचा जबाब नोंदविला. दरम्यान, पशुवैद्यकीय अधिकारी, मुरबाड यांच्यामार्फत वासराचे शव विच्छेदन करण्यात आले. कोरावळे गावातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या आणि आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना वन विभागाकडून देण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT