अंबरनाथ, ता. ५ (वार्ताहर) : भररस्त्यात ८३ वर्षीय वृद्ध महिलेची सोनसाखळी हिसकावून नेल्याची घटना अंबरनाथ पूर्वेतील कानसई परिसरात शनिवारी (ता. ४) रात्री ९.५०च्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भैरव को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीच्या गेटसमोर चारुशीला जीवन रॉबर्ट या त्यांच्या आई सुमन त्रिभुवन (वय ८३) यांच्यासोबत रिक्षाची वाट पाहत उभ्या होत्या. याच वेळी काळ्या रंगाच्या स्पोर्ट्स दुचाकीवरून दोन तरुण तेथे आले. दुचाकी चालकाने हेल्मेट घातले होते, तर मागील व्यक्तीने चेहऱ्यावर मास्क लावला होता. त्यांनी दुचाकी थेट वृद्ध महिलेच्या जवळ आणत गळ्यातील सोनसाखळी हिसकावत भरधाव वेगाने पसार झाले. याप्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक मच्छिंद्र कोल्हे तपास करत असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.