भिवंडी, ता. ५ (बातमीदार) : शहरात कौटुंबिक वादाने गंभीर वळण घेत एका तरुणाने आपल्या बहिणीवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात संबंधित महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
भिवंडी शहर पोलिसांच्या माहितीनुसार, कामतघर परिसरातील हनुमाननगर येथे ही घटना घडली. फेणेगावचा रहिवासी प्रदीप सरोज (वय ३२) याने जुन्या वादाच्या कारणावरून हा हल्ला केल्याचे समोर आले आहे. आरोपी आणि पीडित महिलेच्या कुटुंबामध्ये यापूर्वीही अनेकदा वादविवाद झाल्याची माहिती आहे. शुक्रवारी सकाळी ८ च्या सुमारास प्रदीपने रागाच्या भरात ‘देवी’ या आपल्या बहिणीवर चाकूने वार केला. महिलेच्या पोटाच्या खालच्या भागात वार झाल्याने ती गंभीर जखमी झाली. तू माझ्याविरुद्ध पोलिसांत तक्रार केली आहेस. आता तुला धडा शिकवतो, अशी धमकी त्याने दिल्याचेही समोर आले आहे. घटनेनंतर जखमी महिलेला तत्काळ रुग्णालयात दाखल केले असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, प्रदीप सध्या फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पथके रवाना झाली आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विशाल पवार करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.