मुंबई

समस्या मांडा थेट महापौरांसमोर

CD

समस्या मांडा थेट महापौरांसमोर
दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी महापौर दिन

भाईंदर, ता. ५ (बातमीदार) : नागरिकांना आपल्या समस्या आता थेट महापौरांसामोर मांडता येणार आहेत. मिरा-भाईंदरच्या महापौर डिंपल मेहता दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी महापौरदिनाच्या माध्यमातून नागरिकांना भेटणार आहेत. या वेळी महापालिकेचे अधिकारीदेखील उपस्थित राहणार असल्याने नागरिकांच्या तक्रारींचा जलद गतीने निपटारा होण्यास मदत होणार आहे.

नागरिकांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी महापालिका आयुक्तांकडून दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाहीदिनाचे आयोजन केले जाते. मंत्र्यांकडूनही जनता दरबाराच्या माध्यमातून नागरी समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला जातो. त्यात आता महापौरदिनाची भर पडली आहे. महापौर डिंपल मेहता यांनी पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर महापालिकेची रुग्णालाये, शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्रे यांना भेटी देऊन तेथील समस्यांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. त्यापाठोपाठ आता महापौरदिनाच्या माध्यमातून त्या थेट नागरिकांच्या समस्या ऐकून घेणार आहेत.

पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, अतिक्रमण, मालमत्ता कर, आरोग्य तसेच महापालिकेच्या इतर नागरी सुविधांशी संबंधित नागरिकांच्या तक्रारी यावेळी ऐकून घेतल्या जाणार आहेत. या वेळी महापौरांसह पालिका आयुक्त आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारींवर त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश दिले जाणार आहेत. या उपक्रमामुळे नागरिकांना महापालिका कार्यालयांच्या वारंवार चकरा माराव्या लागणार नाहीत. तसेच तक्रारींच्या निवारण प्रक्रियेत पारदर्शकता आणि गती येणार आहे. नागरिक आणि प्रशासन यांच्यातील संवाद यामुळे अधिक सशक्त होणार आहे. नागरिकांनी या संधीचा लाभ घेऊन आपल्या समस्या थेट मांडाव्यात, असे आवाहन महापौर डिंपल मेहता यांनी केले आहे.
---------------

अधिकाऱ्यांकडून तक्रारींना केराची टोपली

एकीकडे महापौरांकडून नागरिकांच्या तक्रार निवाराणासाठी महापौरदिनाचे आयोजन करण्यात आले असताना दुसरीकडे महापालिकेचे अधिकारी आलेल्या तक्रारींची वेळेवर दखलच घेत नसल्याची बाब उघडकीस आली आहे. लोकशाहीदिन, आपले सरकार पोर्टल, महापालिकेचे माय एमबीएमसी मोबाईल ॲप यावर नागरिकांच्या अनेक तक्रारी प्राप्त होत असतात. शिवाय लोकप्रतिनिधीदेखील प्रशासनाकडे अनेक तक्रारी दाखल करत असतात. मात्र, या तक्रारींवर विलंबाने कार्यवाही होत असल्याचे तसेच तक्रारदारांना समाधानकारक उत्तरे देण्यात येत नसल्याचे उघड झाले आहे. ही बाब मुख्यालय उपायुक्त डॉ. सचिन बांगर यांनी गांभीर्याने घेतली आहे. आलेल्या तक्रारींचा मुदतीत निपटारा करावा व त्याचा अहवाल सादर करावा, अशा स्पष्ट सूचना उपायुक्तांनी सर्व विभागा प्रमुखांना दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT