मुंबई

उरणमध्ये पुलाजवळ रस्ता खचला

CD

उरणमध्ये पुलाजवळ रस्ता खचला
प्रशासनाकडून तातडीची दखल
दुरुस्तीला वेग
उरण, ता. ५ (बातमीदार) : आयात-निर्यात वाहतुकीस गती देण्यासाठी जेएनपीए प्रशासनाने उभारलेल्या चौथ्या बंदराला जोडणाऱ्या उड्डाणपुलाजवळील रस्ता अचानक खचल्याची घटना समोर आली आहे. राष्ट्रीय महामार्ग ४ बी व राज्यमार्ग ५४ यांना जोडणाऱ्या या महत्त्वाच्या मार्गावरील बिघाडामुळे प्रशासनाने तातडीने दखल घेत दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे.
जसखार गावाला वळसा घालत थेट चौथ्या बंदराशी जोडणारा हा पूल काही काळापूर्वीच कार्यान्वित झाला होता. मात्र, पुलाला जोडणाऱ्या रस्त्याचा काही भाग अचानक खचल्याने एकच खळबळ उडाली. सुरक्षेच्या दृष्टीने या मार्गावरील वाहतूक तत्काळ बंद करण्यात आली असून, सध्या येथे दुरुस्तीचे काम सुरू आहे.
दरम्यान, या प्रकल्पाच्या कामावर सुरुवातीपासूनच स्थानिकांनी आक्षेप घेतला होता. कामादरम्यान जसखार येथील आराध्य दैवत श्री रत्नेश्वरी देवी मंदिराला तडे गेल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता. आता रस्ता खचल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. यापूर्वी जासई येथे उड्डाणपुलाचा खांब ढासळून कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती, तिची आठवणही ताजी झाली आहे.
रत्नेश्वरी देवीच्या जत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात भाविकांची गर्दी वाढत असते. तसेच परिसरातील उद्यानामुळे पर्यटकांचीही वर्दळ असते. अशा ठिकाणी घडलेली ही घटना गंभीर मानली जात असून, संभाव्य धोका टळल्याची भावना व्यक्त होत आहे.
याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी रवींद्र इंगोले यांनी सांगितले की, जॉइंट भागात तांत्रिक कारणांमुळे रस्ता खचला होता. संबंधित ठेकेदारावर १० वर्षे देखभालीची जबाबदारी असल्याने दुरुस्तीचे काम त्याच्याकडून करून घेण्यात आले असून, सध्या काम पूर्ण झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलासह कुटुंब संपवेन! व्हिडीओ कॉलवर कपडे काढायला लावले; ४३ वर्षीय महिलेचा VIDEO केला व्हायरल; २३ ते २८ वर्षांच्या तिघांना अटक

Pune Crime : कारागृहातूनही आंदेकर टोळी सक्रिय; पुणे पोलिस आयुक्तांचे कारागृह प्रशासनाला कडक निर्बंधांचे पत्र

America-Pakistan Relations: 'शांतिदूत' बनलेल्या पाकिस्तानला अमेरिकेचा दणका; ट्रम्प यांचा 'तो' प्रस्ताव ऐकून शहबाज यांना शब्द फुटेना

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT