जुहूगाव चौपाटीवर महापालिकेची स्वच्छता मोहीम
मृत मासे प्रकरणानंतर प्रशासन सतर्क
वाशी, ता. ५ (बातमीदार) : वाशी सेक्टर १० येथील वर्दळीच्या मिनी सीशोअर अर्थात जुहूगाव चौपाटी परिसरात नवी मुंबई महापालिकेकडून सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६च्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली.
महापालिका आयुक्तांनी घेतलेल्या बैठकीत घनकचरा व्यवस्थापन, पर्यावरण, सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी, स्थापत्य व उद्यान विभागांना दृश्यात्मक स्वच्छतेवर भर देण्याचे आदेश दिले होते. दोन दिवसांपूर्वी चौपाटीलगत असलेल्या धारण तलावात मोठ्या प्रमाणात मासे मृत्युमुखी पडल्याची तक्रार प्राप्त झाली होती. या घटनेची गंभीर दखल घेत पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलली आहेत.
या पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्त सुनील पवार व उपआयुक्त डॉ. अजय गडदे यांच्या नियंत्रणाखाली धारण तलाव व परिसरात सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या वेळी उपआयुक्त डॉ. अजय गडदे व मुख्य स्वच्छता अधिकारी नरेश अंधेर उपस्थित होते. सुमारे ४० हून अधिक स्वच्छताकर्मींनी स्वच्छता अधिकारी जयश्री आढळ व स्वच्छता निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तलाव परिसर आणि आजूबाजूचा भाग स्वच्छ केला. या मोहिमेत पर्यावरणप्रेमी नागरिकांचाही सक्रिय सहभाग दिसून आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.