सलमानचा अंगरक्षक शेराची उच्च न्यायालयात धाव
गुन्हा रद्द करण्यासाठी याचिका
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : अभिनेता सलमान खानचा अंगरक्षक गुरमीतसिंग सुंदरसिंग जॉली ऊर्फ शेराने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आपल्याविरोधात नोंदवलेला गुन्हा रद्द करण्यासाठी मुख्य मागणी शेराने याचिकेतून केली असून, त्यावर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.
सलमानचा अंगरक्षक म्हणून प्रसिद्ध असलेल्या शेरावर एका महिलेला धमकावल्याचा आरोप आहे. २०१७ मधील प्रसिद्ध रिॲलिटी शो बिग बॉसमध्ये काही आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे सलमानने एका स्पर्धकाला बिग बॅासच्या घरातून बाहेरचा रस्ता दाखवला. याप्रकरणी सलमानविरोधात शबनम शेख या स्पर्धकाला घेऊन मुंबई पोलिसांत तक्रार करण्यासाठी जात असताना तक्रार करून सलमानला विनाकारण त्रास देऊ नका अन्यथा परिणाम फार वाईट होतील, असा धमकीवजा इशारा शेराने दिल्याचा आरोप शेख यांनी खार पोलिस ठाण्यात रीतसर तक्रारीत केला. त्यानंतर शेराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी तपास पूर्ण करीत २०१९ मध्ये आरोपपत्रही दाखल केले असून, लवकरच हा खटला सुरू होणार आहे. तर आरोपनिश्चिती प्रक्रियेकरिता न्यायालयात लवकरच शेराला हजर राहावे लागणार आहे.
सुनावणीला स्थगिती देण्याची मागणी
मुंबई पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा आणि आरोपपत्र रद्द करावे, अशी प्रमुख मागणी शेराने याचिकेत केली आहे. शेराने त्याच्याविरोधातील सर्व आरोपांचे खंडन केले असून, आपण संबंधित महिलेला फोन केल्याचा कोणताही ठोस पुरावा नाही. फोन रेकॉर्डिंगमध्ये असलेला आवाज हा आपलाच आहे, याचा कोणताही शास्त्रोक्त पुरावाही जोडलेला नसल्याचे शेराने याचिकेत म्हटले आहे. त्यामुळे या याचिकेवर निर्णय होईपर्यंत या खटल्यात आपल्याविरोधात आरोपनिश्चितीला आणि सत्र न्यायालयातील खटल्याच्या सुनावणीला स्थगिती द्यावी, अशी मागणी शेराने केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.