नवाळे गावात आनंदाची लाट
जलवाहिनी टाकण्याच्या कामाला सुरुवात
वसई, ता. ६ (बातमीदार)ः वसई-विरार पालिका अस्तित्वात आल्यानंतर अनेक गावे तहानलेली आहेत. अशात प्रदीर्घ कालावधीतनंतर वसई निर्मळ येथील नवाळे गावात जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे लवकर पाणी मिळेल, अशी आशा पल्लवित झाल्या आहेत.
वसई-विरार पालिकेकडून पाणी मिळावे, यासाठी अनेकदा प्रशासनाकडे मागणी केली होती. पिण्याच्या पाण्याची समस्या निकाली काढता यावी, यासाठी प्रयत्न होते. प्रशासकीय राजवटीत गती आली नाही. सद्यःस्थिती अमृत योजनेंतर्गत जलवाहिनी अंथरणे, जुन्या जलवाहिनी बदलणे तसेच पाण्याच्या टाक्या उभारण्याचे काम सुरू आहे. नवाळे गावात पिण्याचे पाणी ग्रामस्थांना मिळावे, यासाठी मागणी केली. बहुजन विकास आघाडीचे माजी आमदार हितेंद्र ठाकूर, माजी आमदार क्षितिज ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली जलवाहिनीचे भूमिपूजन महापालिकेचे उपमहापौर मार्शल लोपीस यांनी रविवारी केले. या वेळी नगरसेवक परेश किणी, नगरसेविका सॅरल डाबरे उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.