मुंबई

डोंबिवलीत ‘कृष्णछटा’चा सुरेल त्रिवेणी संगम

CD

डोंबिवलीत ‘कृष्णछटा’चा सुरेल त्रिवेणी संगम
गायत्री कोल्हटकर यांचा प्रभावी स्वराविष्कार; रसिक मंत्रमुग्ध
डोंबिवली, ता. ६ : शहरातील सर्वेश सभागृहात शनिवारी रंगलेल्या ‘कृष्णछटा’ या संगीतमय कार्यक्रमाने रसिकांना भक्तिरसात न्हाऊ घातले. आघाडीच्या गायिका आणि संगीत दिग्दर्शिका गायत्री सिधये कोल्हटकर यांच्या या एकल सादरीकरणाला डोंबिवलीकर रसिकांनी उदंड प्रतिसाद दिला.

भारतीय परंपरेचे केंद्रस्थान असलेल्या भगवान श्रीकृष्णाच्या विविध छटा उलगडण्यासाठी संगीत, वादन आणि नृत्य या तिन्ही कलांचा सुरेख संगम या कार्यक्रमात पाहायला मिळाला. शास्त्रीय, उपशास्त्रीय आणि सुगम संगीताचा मिलाफ साधत गायत्री कोल्हटकर यांनी आपल्या बहुआयामी गायकीचा परिचय करून दिला.

कार्यक्रमाची सुरुवात राग बागेश्रीतील स्वरचित बंदिशीने झाली. त्यानंतर स्वरचित होरी, नाट्यगीत, भावगीत, अभंग आणि लोकप्रिय चित्रपट गीतांमधून कृष्णाच्या विविध रूपांचे दर्शन घडले. अमित पाध्ये (संवादिनी) यांनी ‘वद जाऊ कुणाला शरण ग’ तर अद्वैत काशीकर (बासरी) यांनी ‘आज गोकुळात रंग खेळतो हरी’ या रचनांतून रसिकांची दाद मिळवली. रक्षानंद पांचाळ (तबला), संदेश कदम (पखवाज) आणि राजन धुपकर (तालवाद्य) यांनी समर्थ साथसंगत केली. कथ्थक नृत्यांगना दिप्ती ठाकूरदेसाई यांनी ‘मोहे पनघट पे’ यांसह विविध पदांवर बहारदार नृत्य सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली.

विद्वत्तापूर्ण सादरीकरण
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयुरेश साने यांनी आपल्या ओघवत्या शैलीत केले. संगीताच्या विविध प्रकारांतून श्रीकृष्णाचा जीवनपट मांडणारा हा प्रयोग डोंबिवलीकरांसाठी एक अविस्मरणीय पर्वणी ठरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलासह कुटुंब संपवेन! व्हिडीओ कॉलवर कपडे काढायला लावले; ४३ वर्षीय महिलेचा VIDEO केला व्हायरल; २३ ते २८ वर्षांच्या तिघांना अटक

Pune Crime : कारागृहातूनही आंदेकर टोळी सक्रिय; पुणे पोलिस आयुक्तांचे कारागृह प्रशासनाला कडक निर्बंधांचे पत्र

America-Pakistan Relations: 'शांतिदूत' बनलेल्या पाकिस्तानला अमेरिकेचा दणका; ट्रम्प यांचा 'तो' प्रस्ताव ऐकून शहबाज यांना शब्द फुटेना

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT