मुंबई

कोळसेवाडी रिक्षा स्टँडवर चालकांची दादागिरी

CD

कोळसेवाडीत रिक्षाचालकांची दादागिरी
प्रवाशांशी गैरवर्तनाबाबत पोलिसांकडे तक्रार
कल्याण, ता. ५ (वार्ताहर) : कोळसेवाडी रिक्षा स्टँडवर रिक्षाचालकांची मनमानी आणि दादागिरी शिगेला पोहोचली आहे. स्टँड परिसरात येणारे दुचाकीचालक आणि खासगी वाहने उभी करणाऱ्या नागरिकांशी रिक्षाचालक उद्धटपणे वागत असून, रिक्षा स्टँड म्हणजे आपली खासगी मालमत्ता असल्याचा आव चालकांकडून आणला जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री शरद शिंदे नावाचे स्थानिक नागरिक आपल्या अल्पवयीन मुलीला घेण्यासाठी स्कायवॉकजवळ पोहोचले होते. या वेळी तेथे उपस्थित असलेल्या काही रिक्षाचालकांनी त्यांना वाहन उभे करण्यास मज्जाव केला. शिंदे यांनी परिस्थिती स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला, तरीही चालकांनी त्यांच्याशी हुज्जत घालत दादागिरी केली. स्कायवॉकवरून रात्रीच्या वेळी येणाऱ्या आपल्या कुटुंबातील सदस्यांना घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना अशा प्रकारे धमकावले जात असल्याने भीतीचे वातावरण आहे.

प्रवाशांच्या तक्रारींचा पाढा
स्थानिक नागरिकांनी रिक्षाचालकांच्या कारभारावर गंभीर ताशेरे ओढले आहेत. ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक पैसे मागणे, रिक्षात चौथी सीट भरण्याच्या नावाखाली प्रवाशांना तासनतास ताटकळत ठेवणे,
अनेक चालक गणवेशाचे नियम पाळत नाहीत आणि प्रवाशांशी असभ्य भाषेत बोलतात, अशा तक्रारी केल्या आहेत.

कडक कारवाईची मागणी
या प्रकारानंतर शरद शिंदे यांनी कोळसेवाडी पोलिस ठाणे, वाहतूक विभाग आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे रीतसर तक्रार दाखल केली आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्रास देणाऱ्या आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अशा उद्दाम रिक्षाचालकांवर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: पावसाचा तांडव... कोलकाता-पंजाब सामना रद्द करावा लागला, १-१ गुणाने नेमका कोणाचा फायदा झाला?

रणवीरने केली अजून एक नक्कल, श्रेया घोषालने सुद्धा दिली साथ, व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले... हा नाही सुधारणार

Court Decision: मोठी बातमी! बाप-लेकाच्या मृत्यू प्रकरणात ९ पोलिसांना फाशीची शिक्षा; तामिळनाडूतील कोर्टाचा निर्णय

New Labour Law: कर्मचाऱ्यांची लॉटरी! उरलेल्या सुट्ट्यांवर मिळणार थेट कॅश; एकही Leave वाया जाणार नाही, काय आहेत नवे नियम?

IPL 2026 Controvarsy: बस्सsss झालं... SRH ची मालकीण काव्या मारन संतापली, BCCI कडे आवेश खानसह दोन वादग्रस्त निर्णयाची तक्रार

SCROLL FOR NEXT