मुंबई

नगरपरिषदेकडून ११ कोटींहून अधिक कर वसुली

CD

पालघर नगर परिषदेला धनलाभ
११ कोटींहून अधिकच्या करवसुलीत यश
पालघर, ता. ६ ः पालघर नगर परिषदेच्या मालमत्ता कर विभागाकडून १२ कोटी ५३ लाख रुपये वसुलीचे ध्येय ठेवण्यात आले होते. प्रत्यक्षात ११ कोटी २६ लाख रुपये जमा झाले आहेत. त्यामुळे यंदा ९० टक्के वसुलीचे उद्दिष्ट गाठले असून, शासनाच्या अभय योजनेला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.
मालमत्ता करवसुलीत ११ कोटी २६ लाखांचा टप्पा पार केला आहे. आतापर्यंत ८९ टक्क्यांहून अधिक वसुलीचे यशस्वी उद्दिष्ट नगर परिषदेने गाठले आहे. पाणीपट्टीसाठीटी ऑनलाइन कर भरणा प्रणाली तांत्रिक कारणांनी बंद असल्याने ही वसुली करण्यासाठी प्रत्यक्ष कर भरणा प्रणाली खिडकी योजनेतून सुरू करण्यात आली आहे. या माध्यमातून नगर परिषदेने १.६९ कोटींचा पाणीपट्टी कराची वसुली केली आहे. तसेच करदात्याना विलंब शुल्क माफही करण्यात आले असल्याने आतापर्यंत एक कोटीपेक्षाची जास्त वसुली झाली आहे.
------------------------
देयकांचे घरोघरी वाटप
महाराष्ट्र शासनाच्या बंधनकारक असलेल्या संगणकीय प्रणालीत (आयडब्लूपी) वारंवार सर्व्हर डाऊन होण्याच्या समस्या उद्भवत होत्या. यामुळे जून २०२४ पासून पाणी देयके दिली जात नव्हती. परिणामी, कोट्यवधींचा महसूल थांबला होता. अखेर पाणीपुरवठा विभागाने घरोघरी जाऊन देयके देण्यास सुरुवात केली आहे.
------------------------------
विलंब शुल्क माफ
ज्या नागरिकांची वर्षभराची किंवा त्यापेक्षा जास्त थकबाकी आहे, त्यांना रक्कम टप्प्याटप्प्याने भरण्याची मुभा देण्यात आली आहे. तांत्रिक कारणामुळे देयके उशिरा गेल्याने दंड किंवा विलंब शुल्क आकारले जाणार नाही. असे आवाहन पाणीपुरवठा विभाग अभियंता श्रीकांत बगाड यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bachchu Kadu on Uddhav Thackeray: 'पाठिंबा दिला म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री', बच्चू कडूंचे जशास तसे उत्तर

MS Dhoni चेन्नई सुपर किंग्सचा नवा प्रशिक्षक? R Ashwin चे मोठे विधान, स्टीफन फ्लेमिंगच्या उचलबांगडीची चर्चा; म्हणाला, तुम्हाला दुसरा...

Monsoon In Goa Konkan : मॉन्सून गोवा, कोकण किनारपट्टीवर दाखल? राज्यात ४ दिवस वादळी पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा

राज्यसभेसाठी छगन भुजबळांचा पत्ता कट? जागेसाठी राष्ट्रवादीत नव्या 'या' ४ नावांची चर्चा; महायुतीचा '१२-३-२' फॉर्म्युला काय?

Mumbai Indians: रोहित शर्मा RR विरुद्धच्या सामन्यात खेळणार की नाही? जयवर्धनेने दिले अपडेट्स, संघाच्या अपयशाचं कारणही सांगितलं

SCROLL FOR NEXT