मुंबई

धर्मवीर आनंद दिघे उड्डाणपुलावर भीषण अपघात

CD

खारेगाव उड्डाणपुलावर कार-रिक्षाची धडक
दोघे गंभीर जखमी; पहाटेच्या सुमारास अपघात, वाहतूक विस्कळीत

ठाणे, ता. ६ : कळवा परिसरातील खारेगाव येथील स्व. धर्मवीर आनंद दिघे उड्डाणपुलावर सोमवारी (ता. ६) पहाटे पावणेसहाच्या सुमारास कार आणि रिक्षाचा भीषण अपघात झाला. या समोरासमोर झालेल्या धडकेत रिक्षाचालक आणि प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सोमवारी सकाळी ५.४२ वाजेच्या सुमारास कळवा पूर्वेकडून येणारी रिक्षा आणि ठाण्याकडून कळवा पूर्वेकडे जाणारी चारचाकी कार यांच्यात उड्डाणपुलावर जोरदार धडक झाली. यात रिक्षाचालक गोविंद पवार (वय ४३, रा. गणपती पाडा) आणि प्रवासी प्रथमेश चव्हाण (३२, रा. घोलाईनगर) या दोघांच्याही डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. अपघातग्रस्त कार ही प्रशांत चव्हाण यांच्या मालकीची असून, चालक यावेळी एकटाच प्रवास करत होता.

तातडीने मदतकार्य
अपघातानंतर वाहनांमधील ऑईल मोठ्या प्रमाणात रस्त्यावर सांडले होते, ज्यामुळे इतर वाहने घसरण्याची भीती निर्माण होऊन वाहतूक मंदावली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिस कर्मचारी रवींद्र महाजन यांनी नियंत्रण कक्षाला कळवले. ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सांडलेल्या ऑईलवर माती टाकून रस्ता सुरक्षित करण्यात आला.

वाहतूक सुरळीत
आपत्ती व्यवस्थापन आणि पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या सहाय्याने बाजूला केली. सकाळी रस्ता पूर्णपणे मोकळा केल्यानंतर या मार्गावरील वाहतूक पुन्हा पूर्ववत झाली. दोन्ही वाहनांचे या अपघातात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: पावसाचा तांडव... कोलकाता-पंजाब सामना रद्द करावा लागला, १-१ गुणाने नेमका कोणाचा फायदा झाला?

रणवीरने केली अजून एक नक्कल, श्रेया घोषालने सुद्धा दिली साथ, व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले... हा नाही सुधारणार

Court Decision: मोठी बातमी! बाप-लेकाच्या मृत्यू प्रकरणात ९ पोलिसांना फाशीची शिक्षा; तामिळनाडूतील कोर्टाचा निर्णय

New Labour Law: कर्मचाऱ्यांची लॉटरी! उरलेल्या सुट्ट्यांवर मिळणार थेट कॅश; एकही Leave वाया जाणार नाही, काय आहेत नवे नियम?

IPL 2026 Controvarsy: बस्सsss झालं... SRH ची मालकीण काव्या मारन संतापली, BCCI कडे आवेश खानसह दोन वादग्रस्त निर्णयाची तक्रार

SCROLL FOR NEXT