मुंबई

संपादन मोबदल्यावरील प्राप्तिकर माफ

CD

आर्थिक नुकसानीतून प्रकल्पग्रस्तांची सुटका
राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन मोबदल्यावरील प्राप्तिकर माफ
मोखाडा, ता.६(बातमीदार)ः राष्ट्रीय महामार्ग कायद्यांतर्गत संपादित केलेल्या जमिनीच्या मोबदल्यावर आता कोणताही प्राप्तिकर लागणार नाही, तसेच टीडीएस कापला जाणार नाही, नसल्याचा निर्णय रस्ते वाहतूक, महामार्ग मंत्रालयाने जाहीर केला आहे. या निर्णयामुळे देशभरातील हजारो प्रकल्पग्रस्तांना आर्थिक दिलासा मिळाला आहे.
खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी २२ मार्च रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची या गंभीर विषयासंदर्भात भेट घेतली होती. यावेळी मुंबई-वडोदरा एक्स्प्रेस वे सारख्या राष्ट्रीय महामार्गांसाठी जमिनी संपादित केल्या जात आहेत. मात्र, मिळणाऱ्या मोबदल्यावर कर आकारल्याने प्रकल्पग्रस्तांचे आर्थिक नुकसान होत असल्याची बाब खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी केंद्रीय मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली होती.
------------------------------------
अधिकाऱ्यांना निर्देश
​राष्ट्रीय महामार्ग कायद्यांतर्गत मिळालेला भूसंपादन मोबदला प्राप्तिकरातून पूर्णपणे मुक्त करण्यात आला आहे. मोबदल्याच्या रकमेतून आता कोणताही टीडीएस कापला जाणार नाही. या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे स्पष्ट निर्देश एनएचएआय, एनएचआयडीसीएल, सर्व भूसंपादन अधिकाऱ्यांना दिले आहेत.
-------------------------
पालघर जिल्ह्यातील हजारो शेतकरी, भूधारक व प्रकल्पग्रस्तांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या घामाच्या पैशावर कर आकारला जाऊ नये, यासाठीच्या लढ्याला आज यश आले.
- डाॅ. हेमंत सवरा, खासदार, पालघर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: : केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार 4 पट वाढणार? रेल्वे युनियनचा मोठा प्रस्ताव; कोणाचा पगार किती वाढणार?

FACT CHECK : वैभव सूर्यवंशीला Mumbai Indians कडून ३० कोटींची ऑफर; ललित मोदीने सत्य समोर आणलं, नेमकं काय सुरूय?

CBSE च्या नव्या नियमाने विद्यार्थ्यांवर संकट? त्रिभाषा धोरणावर सुप्रीम कोर्ट संतापले, केंद्र सरकारला नोटीस!

'मराठी असून हिजाब का घातला?' अंकिता लोखंडेला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, पोस्ट Viral

मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतोय! सिद्धरामय्यांची घोषणा, डीके शिवकुमार यांनी चरणस्पर्श करत घेतले आशीर्वाद

SCROLL FOR NEXT