खारघर, ता. ६ (बातमीदार) : खंडणीसाठी हल्ला करणाऱ्या व्यक्तींविरोधात कायदेशीर कारवाई करण्याऐवजी त्यांना अभय देण्याचे काम माणगाव येथील वरिष्ठ पोलिस निरीक्षक करीत असल्याचा आरोप शरद सावंत यांनी खारघर येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे. तसेच त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे पोलिस महासंचालक यांच्याकडे केली आहे.
खारघरमध्ये वास्तव्यास असलेले शरद सावंत यांची मुलगी ॲड. पौर्णिमा सावंत यांनी माणगाव येथील नीळघून गावातील शेतकरी बाळकृष्ण कदम यांच्याकडून मागील वर्षी ५६ गुंठे शेतजमीन खरेदी केली होती. तिच्या भोवती संरक्षण भिंत उभारण्यासाठी मुलगा सिद्धात सावंत हा तेथे गेला असता, काही व्यक्तींनी १० लाखांची मागणी करून त्याला शिवीगाळ करून मारहाण केली. याबाबत माणगाव पोलिस ठाण्यात लेखी तक्रार केली असता, रात्रीच्या वेळी संशयितांनी मोबाईलवर संपर्क साधून पुन्हा खंडणीची मागणी केली. याप्रकरणी माणगाव पोलिस ठाण्यात लेखी तक्रार करूनही वरिष्ठ अधिकारी निवृत्ती बोराडे यांनी कारवाई केली नाही. त्यांच्यावर कारवाईसाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केल्याचे सावंत यांनी सांगितले.
दमदाटी केल्याचा दावा
यासंदर्भात वरिष्ठ पोलिस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे संपर्क केला असता, सावंत हे बाहेरून लोकांना आणून शेतकऱ्यांना दमदाटी करतात, हे योग्य नाही. आम्ही जनतेच्या हितासाठी काम करीत आहोत. त्यांनी केलेल्या तक्रारीविरोधात लवकरच नोटीस पाठविणार असल्याचे सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.