सिलिंडरच्या साठेबाजीला लगाम
जिल्हा प्रशासनाकडून कारवाईचा धडाका
पालघर, ता. ६ ः युद्धजन्य स्थितीमुळे व्यावसायिक, घरगुती एलपीजी सिलिंडरसाठी नागरिकांची परवड होत होती. मात्र, दोन महिन्यांनंतर जिल्ह्यातील परिस्थिती पूर्वपदावर येत असून, पुरवठा सुरळीत सुरू झाला आहे.
जिल्हा प्रभारी पुरवठा अधिकारी सीमा महल्ले यांच्या नेतृत्वाखाली सिलिंडरची साठेबाजी होण्याची शक्यता लक्षात घेता तालुकानिहाय पथके नेमण्यात आली होती. या पथकांनी जिल्ह्यातील गॅस एजन्सी, हॉटेल आणि इतर ठिकाणी अशा २१३ ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. त्यानुसार वसई तालुक्यात १४ मार्च रोजी एक गुन्हा दाखल झाला असून, तीन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. दुसऱ्या घटनेत वसई येथील एका सीएनजी पंपावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, तर वाडा तालुक्यामध्ये अवैध रिफिलिंग करून साठवणूक करण्यात आलेल्या ठिकाणी १७१ सिलिंडर आणि रिफिलिंगसाठी लागणारी यंत्रणा जप्त करण्यात आली होती.
------------------------
ग्राहकांना दिलासा
भारत गॅस, इंडियन ऑइल, एचपी आणि इतर एलपीजी पुरवठादार कंपनीकडून घरगुती सिलिंडर मागणीएवढे पुरवले जात असल्याची माहिती पुरवठा शाखेने दिली आहे. सिलिंडरसाठी तालुका, जिल्हा स्तरावर ग्राहक तक्रार निवारण कक्ष स्थापण्यात आले असून, ग्राहकांच्या तक्रारीचे निरसन केले जात आहे. सिलिंडरसाठी डिजिटल बुकिंग पूर्वपदावर आल्या असल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
--------------------------
पालघर जिल्ह्यातील साठा
एजन्सीचे नाव घरगुती व्यावसायिक शिल्लक विक्री
भारत गॅस २१,९०० २,६०० २०,४१६ १२,७००
हिंदुस्थान पेट्रोलियम ९,३६६ ६६१ ७,४२१ ५,३९९
इंडियन ऑइल २,३०० २८१ ४,८०० १,३००
-------------------------
पुरवठा पूर्वपदावर
पालघर जिल्ह्यात भारत पेट्रोलियम, एचपी, इंडियन ऑइल अशा तीनही कंपनीच्या एजन्सी मिळून दररोज ३३ हजार ५७४ घरगुती सिलिंडरची गरज आहे, तर ३,६०५ व्यावसायिक सिलिंडर मागणी आहे. सध्या जिल्ह्यात ३२,६९० च्या जवळपास सिलिंडर उपलब्ध होत असून, १९,४६५ सिलिंडर विक्री होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.