मुंबई

खवय्यांसाठी यंदा आंबा महागच!

CD

तुर्भे, ता. ६ (बातमीदार) : एप्रिलचा पहिला आठवडा उलटला तरी वाशीच्या घाऊक बाजारात कोकणातून हापूस आंब्यांची हवी तशी आवक होत नाही. आताही बाजारात केवळ सरासरी ३० हजार पेट्यांचीच आवक बाजारात होत आहे. त्यामुळे मुख्य हंगाम सुरू झाला तरी बाजारात हवे तसे हापूस आंबे बघायला मिळत नाहीत. एकूणच कोकणातील आंब्यांची परिस्थिती पाहता उत्पादन यावर्षी कमीच आहे. त्यामुळे बाजारात हापूस आंब्यांची आवक कमी होत आहे. १० एप्रिलनंतर कोकणातील हापूस आंब्यांची आवक वाढणार असल्याचा विश्वास व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

फेब्रुवारी ते मार्च आणि एप्रिल ते मे हा कोकणातील हापूस आंब्याचा मुख्य हंगाम आहे. या वेळी फेब्रुवारी ते मार्च हा पहिला हंगाम बाजारात आंबा नसल्यात जमा होतो. आता हापूस आंब्याचा दुसरा आणि मुख्य हंगाम सुरू होण्याचा कालावधी सुरू झाला आहे, तरीदेखील बाजारात हवा तसा हापूस आंबा पाहायला मिळत नाही. दरवर्षी घाऊक बाजारात एप्रिलच्या सुरुवातीला सरासरी ५० ते ६० हजार हापूस आंब्याच्या पेट्या दाखल होतात आणि त्यानंतर आवक आणखीन वाढत ८० हजार पेट्यांपर्यंत जाते. या वेळी मात्र चित्र बदलले आहे.

घाऊक बाजारात दोन डझन हापूस आंब्यांच्या पेटीला दोन हजारांपासून ते सहा हजारांचा भाव आहे. हा कच्च्या आंब्याच्या पेटीचा भाव आहे. पिकलेल्या तयार हापूस आंब्याच्या पेटीचा भाव यापेक्षा दुप्पट आहे. आंब्याच्या आकारानुसार भाव आकारला जात आहे. उत्पादन कमी असल्याने यावर्षी आंबा व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यांना हवा तसा व्यापार करता येत नाही. परिणामी यावर्षीचा आंब्याचा हंगाम व्यापाऱ्यांसाठी तोट्यात असल्याचे व्यापारी सांगत आहेत.

यावर्षी आंब्याचे उत्पादन कमी आहे. त्यामुळे घाऊक बाजारात हापूस आंब्याची आवक कमी आहे. आवक कमी असल्याने व्यापारावर त्याचा परिणाम होत आहे. आता १० एप्रिलपासून आंब्याची आवक काही प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. ही आवक वाढल्यास व्यापाऱ्यांना त्याचा फायदा होईल. शिवाय आंबा खवय्यांना हापूस आंब्याची चांगली चव चाखता येईल.
- संजय पिंपळे, व्यापारी, फळ बाजार

हवामानाचा फटका
लहरी आणि बदलत्या हवामानाचा फटका बसल्यानेे यावर्षी कोकणातील ७० टक्के हापूस आंब्याचे नुकसान झाले आहे. त्यामुळे हापूसची आवक कमीच आहे. त्यामुळे एप्रिलमध्येही बाजारात हापूस आंबा कमीच आहे. परिणामी यावर्षी हापूस आंब्याचे भावही चढेच आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलासह कुटुंब संपवेन! व्हिडीओ कॉलवर कपडे काढायला लावले; ४३ वर्षीय महिलेचा VIDEO केला व्हायरल; २३ ते २८ वर्षांच्या तिघांना अटक

Pune Crime : कारागृहातूनही आंदेकर टोळी सक्रिय; पुणे पोलिस आयुक्तांचे कारागृह प्रशासनाला कडक निर्बंधांचे पत्र

America-Pakistan Relations: 'शांतिदूत' बनलेल्या पाकिस्तानला अमेरिकेचा दणका; ट्रम्प यांचा 'तो' प्रस्ताव ऐकून शहबाज यांना शब्द फुटेना

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT