विशेष मुलांच्या उपचारांसाठी तज्ज्ञांची नियुक्ती
मुंबई महापालिकेची मेगा भरती
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : ऑटिझमग्रस्त तसेच विशेष गरजा असलेल्या मुलांच्या उपचारांसाठी मुंबई महापालिकेने तज्ज्ञांची मेगा भरती प्रक्रिया सुरू केली आहे. ही भरती कंत्राटी व तात्पुरत्या स्वरूपात करण्यात येणार असून, नायर रुग्णालय अंतर्गत चालणाऱ्या अर्ली इंटरव्हेन्शन आणि पुनर्वसन केंद्रासाठी ही पदे भरली जाणार आहेत. पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.
नायर रुग्णालय प्रशासनाने जारी केलेल्या जाहिरातीनुसार, सहाय्यक प्राध्यापक (ऑप्थॅल्मोलॉजी), सहाय्यक प्राध्यापक (ईएनटी), सहाय्यक ऑक्युपेशनल थेरपिस्ट, स्पीच थेरपिस्ट, काउन्सेलिंग सायकोलॉजिस्ट, नर्स, डेटा एन्ट्री ऑपरेटर, तंत्रज्ञ आणि सहाय्यक अशा एकूण १४ प्रकारच्या पदांसाठी ही भरती करण्यात येत आहे. अर्ज करताना सर्व आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे जोडणे अनिवार्य असणार आहे.
निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार दरमहा १५ हजार रुपये ते एक लाख १० हजार रुपये इतके मानधन देण्यात येणार आहे. उमेदवारांची निवड शैक्षणिक पात्रता आणि मुलाखतीतील गुणांच्या आधारे केली जाणार आहे.
ही नियुक्ती पूर्णपणे कंत्राटी पद्धतीने केली जाणार असून, ती तात्पुरत्या स्वरूपाची असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. आवश्यकतेनुसार कोणतीही पूर्वसूचना न देता सेवा समाप्त करण्याचा अधिकार प्रशासनाकडे राहणार आहे. तसेच, निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी किंवा इतर लाभांचा कोणताही दावा करता येणार नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.