मुंबई

ठाणे घोडबंदर रस्त्याची दरवर्षी दुरुस्ती अशक्य

CD

ठाणे-घोडबंदर रस्त्यावरून पत्रप्रंपच
दरवर्षी दुरुस्ती अशक्य, मिरा-भाईंदर पालिकेचे स्पष्टीकरण
भाईंदर, ता. ६ (बातमीदार) : ठाणे-घोडबंदर रस्त्यावरील फाउंटन हॉटेल ते गायमुख यादरम्यानचा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने पुन्हा ताब्यात घ्यावा, असा निर्णय महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला होता. त्यानुसार या रस्त्यांची दरवर्षी दुरुस्ती करणे आर्थिकदृष्ट्या शक्य नसल्याचे पत्र मिरा-भाईंदर पालिकेने राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला पाठवले आहे.
ठाणे-घोडबंदर रस्ता ६० मीटर रुंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एमएमआरडीएला त्याचे काम दिले जाणार आहे. त्यासाठी फाउंटन हॉटेल ते गायमुख हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने दोन वर्षांपूर्वी मिरा-भाईंदर महापालिकेकडे हस्तांतर केला आहे. मात्र, रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी आवश्यक असलेले भूसंपादन, विविध विभागाच्या परवानग्या ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात झालेली नाही. मात्र, तोपर्यंत रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी मिरा-भाईंदर महापालिकेवर आली आहे. गेल्यावर्षी महापालिकेने तब्बल आठ कोटींचा खर्च रस्ते दुरुस्तीसाठी केला होता. मात्र, दरवर्षी एवढा खर्च करणे अशक्य असल्याने पालिकेच्या सर्वसाधारण सभेत रस्ता परत करावा, असा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार हा निर्णयाची माहिती महापालिकेने सार्वजनिक बांधकाम विभागाला कळवली आहे.
---------------------
आठ कोटींचा खर्च
मिरा-भाईंदर शहरातील अवघे पाच टक्केच नागरिक वापर करत असून, उर्वरित ९५ टक्के वापर अन्य शहरातील नागरिक करत आहेत, पण सध्याची आर्थिक स्थिती पाहता दरवर्षी आठ कोटींचा खर्च अशक्य आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पेट्रोल-डिझेल दरवाढ, तुटवड्याने शेतकरी अडचणीत; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जागतिक संकट अन् मागणीही वाढलीय

MI vs RR: आधी आऊट, मग नो बॉल अन् चौकार... जडेजाने शार्दुल ठाकूरची भर मैदानात उडवली खिल्ली! Video होतोय Viral

Sangli Advocate Death : 'माझ्या मृत्यूला कोणालाही...'; मरण्यापूर्वी 27 वर्षीय वकिलाने चिठ्ठीत काय लिहिलं? सांगलीतील घटनेने खळबळ

आश्रम ३ मधील इंटीमेट सीनवर पहिल्यांदाच बोलला बॉबी देओल, म्हणाला, 'मी फार घाबरलो होतो'

विधानपरिषदेआधी काँग्रेसला धक्का? ७० नगरसेवक नॉट रिचेबल; राज्यात खळबळ

SCROLL FOR NEXT