मुंबई

गॅस संपला, लाकडेही मिळेनात; स्वयंपाकाचा प्रश्न गंभीर

CD

आता लाकडेही झाली महाग
गॅस संपला, ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळित

जव्हार, ता. ६ (बातमीदार) : आदिवासी जनसमुदाय असलेल्या जव्हार तालुक्यात केंद्र तसेच राज्य शासनाच्या व सामाजिक संस्थांच्या विविध कल्याणकारी उपक्रमातून येथील जीवनमान सुरळीतपणे सुरू आहे. मात्र जागतिक स्तरावर सुरू असलेल्या युद्धामुळे येथील जनजीवन आता हळूहळू विस्कळित होऊ लागले आहे. या युद्धाचा अधिक फटका नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होत असून, गॅसटंचाईच्या काळात आता चुलीवरील जेवण करण्यासाठी लाकडेही मिळेनाशी झाली आहेत. त्यामुळे आता स्वयंपाक करावा तरी कसा, असा प्रश्न महिलांना पडला आहे.
जव्हार हा तसा ग्रामीण भाग, म्हणून गॅसटंचाई वाढताच येथील बहुतांश नागरिकांनी गोबर गॅस व चुलीवरच्या जेवणाकडे आपला मोर्चा वळवला होता. मागील काही दिवसांत मातीच्या चुलीही खरेदी करण्याकडे महिलांचा कल वाढलेला. एवढच नव्हे तर विजेवर चालणाऱ्या शेगड्या, कोळशाच्या भट्ट्या व सरपणाची मागणी अचानक वाढली. हे सर्व एवढ्या अचानक झाले की, त्याचा थेट परिणाम पुरवठादारांवर होऊ लागला. जव्हारची बाजारपेठ काही मोठी नाही. राहिला प्रश्न लाकडांचा तर अचानक लाकडांची मागणी वाढेल, असा विचार कोणीच केव्हा केला नव्हता. त्यामुळे कोळशाप्रमाणेच लाकडाची मागणीही दिवसेंदिवस वाढू लागली आहे.

गॅसटंचाईच्या काळात गृहिणींना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अनेक वर्षांपासून गॅसवर स्वयंपाक करण्याची लागलेली सवय आता अचानक मोडावी लागत असून, थेट चुलीसाठी सरपण गोळा करण्यासाठी त्यांना माळरानावर जावे लागत आहे. मोठ्या प्रमाणात झालेली वृक्षतोड पाहता वाळलेले सरपणही तेथे उपलब्ध नाही. हा काही एका गृहिणीचा प्रश्न नसून असंख्य महिला माळरानावर सरपण शोधण्यासाठी उन्हातान्हात भटकत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे वेळ व श्रम दोन्ही गोष्टींमध्ये वाढ झाली आहे. दरम्यान, विजेवर अवलंबून राहिल्यामुळे विजेवरील ताण वाढून वारंवार वीज खंडित होणे तसेच कमी-जास्त व्होल्टेजच्या समस्या निर्माण होत आहेत. याचा परिणाम घरगुती वापरासह लहान उद्योगांवरही होत आहे.
-----------
हॉटेलचालक अडचणीत
जव्हार शहर तथा ग्रामीण भागात लहान हॉटेल, टपरीधारक व खाद्यपदार्थ विक्रेते मोठ्या अडचणीत सापडले आहेत. गॅसऐवजी कोळसा किंवा लाकूड वापरल्याने खर्च व वेळ वाढत असून, व्यवसायावर परिणाम होत आहे. काही ठिकाणी जागेअभावी भट्टी किंवा चुलीचा वापर करणे शक्य नसल्याने व्यवसाय बंद करण्याची वेळ आली आहे. गॅसपुरवठा सुरळीत करावा, काळाबाजार रोखावा व दरवाढ नियंत्रणात आणावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. गॅसटंचाईमुळे तालुक्यातील जीवनशैलीत मोठा बदल झाला असून, नागरिक विशेषतः महिलांमध्ये गॅसची चिंता अधिक वाढली आहे.
------------------
वास्तविक पाहता जव्हार शहर हे नागरी भागात येत आहे. अशा भौगोलिक स्थितीत येथील नागरिकांना गॅस सिलिंडर हे २५ दिवसांत मिळणे अपेक्षित होते, मात्र हेच सिलिंडर ४५ दिवसांनी मिळणार असल्याने येथील जनजीवन विस्कळित होऊ लागले आहे.
- मनीषा वाणी, माजी नगरसेविका
------
युद्ध संपेपर्यंत गॅस मिळेल कसा, जेवण बनवावे कसे, जंगलात फिरून लाकडे गोळा करू कधी, असे प्रश्न माझ्यासह तालुक्यातील असंख्य परिवारांना पडले आहेत. त्यामुळे जव्हार तालुक्यात विशेष बाब म्हणून गॅस पुरवठा तरी सुरळीत करण्यात यावा.
- वैभव अभ्यंकर, माजी नगरसेवक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : हार्दिक पांड्याच्या प्रकृतीबाबत मोठे अपडेट्स, MI vs RR सामना खेळणार की नाही? मुंबईच्या कोचचे वैभव सूर्यवंशीबद्दलही विधान

Ambajogai News : स्वारातीच्या पदव्युत्तर विद्यार्थ्याने संपविले जीवन; कारण अस्पष्ट

Nanded Crime News: 3 दिवसात ५ खून, नांदेड हादरलं, अशोक चव्हाण आक्रमक..

Baramati By Election: बॅनरबाजी चर्चेत, आदिती तटकरे चांगल्याच चिडल्या...

Satana News : अवकाळीच्या जखमेवर तांत्रिक मीठ; ७/१२ पोर्टल ठप्प, शेतकरी हवालदिल!

SCROLL FOR NEXT