स्थापना दिनानिमित्त भाजपची स्वच्छता मोहीम
कासा, ता. ६ (बातमीदार) : भारतीय जनता पक्षाच्या ४७ व्या स्थापना दिनानिमित्त सोमवारी (ता. ६) पालघर जिल्हा भाजपच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये स्वच्छता अभियान व रक्तदान शिबिराचा समावेश होता.
कार्यक्रमाला पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत, पालघर लोकसभेचे खासदार हेमंत सवरा, ज्येष्ठ नेते बाबजी काठोळे, जिल्हा उपाध्यक्ष जगदीश राजपूत व पंकज कोरे, जिल्हा सरचिटणीस सुशील औसरकर तसेच डहाणू शहर मंडळ अध्यक्ष पिनल शहा आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी सकाळच्या सत्रात पारनाका येथील समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. कार्यकर्त्यांनी किनाऱ्यावरील कचरा गोळा करून परिसर स्वच्छ केला. त्यानंतर रामवाडी (ता. डहाणू) येथील जिल्हाध्यक्ष कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिराला विशेषतः युवा कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, अनेकांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. या उपक्रमांमुळे समाजात स्वच्छता व रक्तदानाबाबत जनजागृती होण्यास मदत होणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.