मुंबई

रोहा अष्टमी नगरपरिषदे तर्फे एचपीव्ही लसीकरण व जनजागृती मोहिमेचा शुभारंभ

CD

रोहा अष्टमी नगर परिषदेतर्फे एचपीव्ही लसीकरण
रोहा, ता. ६ (बातमीदार) ः रोहा अष्टमी नगर परिषद व दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मंत्री आदिती तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिक सभागृहात ह्युमन पॅपिलोमा व्हायरस (एचपीव्ही) लसीकरण व जनजागृती मोहिमेची सुरुवात करण्यात आली. महिलांना गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण मिळावे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
या वेळी माजी नगराध्यक्ष समीर शेडगे, डॉ. पूजा भट, डॉ. अपूर्वा क्षीरसागर, डॉ. फरीद चिमावकर, नगराध्यक्षा वनश्री शेडगे, उपनगराध्यक्ष अहमद दर्जी, गटनेते महेंद्र गुजर, सभापती महेश कोलाटकर, महेंद्र दिवेकर, नीता हजारे, उपसभापती गौरी बारटक्के, नगरसेविका स्नेहा अंबरे, प्रियांका धनावडे, फराहा पानसरे, पूर्वा मोहिते, संजना शिंदे, अफरीन रोगे, डॉ. अवनी शेडगे, प्रेषित बारटक्के, स्वप्नील धनावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
पूजा भट यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, भारतीय महिलांमध्ये कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूचे दुसरे मोठे कारण म्हणजे गर्भाशय मुखाचा कर्करोग आहे. एचपीव्ही लस पूर्णपणे सुरक्षित असून योग्य वयोगटात घेतल्यास सुमारे ९० टक्के संरक्षण मिळते. लसीबाबत पसरलेल्या अफवा व गैरसमजांना कोणताही शास्त्रीय आधार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या मोहिमेत डॉक्टरांच्या मार्गदर्शनामुळे नागरिकांमध्ये विश्वास निर्माण झाला असून, विविध भाषांमध्ये जनजागृती करून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत या उपक्रमाचा लाभ पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. उपस्थित महिला व युवतींनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत लसीकरणासाठी पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मयूर दिवेकर यांनी केले.

फोटो कॅप्शन :
रोहा ः एचपीव्ही लसीकरण मोहीमअंतर्गत लसीकरण करून घेताना महिला व उपस्थित मान्यवर.

Kolhapur Hockey Player : अवघ्या २३ वर्षीय राज्यस्तरीय हॉकीपटूने घेतला गळफास, उपचारासाठी प्रयत्न केले पण...

अंकिता वालावलकरच्या आंब्याच्या पेट्या चोरीला; यूपीच्या कुरिअरवाल्याने पळवलं सामान; इतक्या हजारांचं नुकसान

Latest Marathi News Live Update : श्री संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्यांची शिकार प्रकरण उघड; 6 आरोपी ताब्यात

Pimpri Chinchwad News : महापालिकेच्या मल्टिस्पेशालिटी रुग्णालयांमुळे रुग्णांना कमी खर्चात मिळतात उत्तम उपचार

Pakistan Lockdown: आज रात्रीपासून पाकिस्तानमध्ये लॉकडाऊन! पंतप्रधान शहबाज शरीफ यांची घोषणा

SCROLL FOR NEXT