कर्जत शहर भाजप मंडळातर्फे स्थापना दिन उत्साहात
कर्जत, ता. ६ (बातमीदार) : कर्जत शहर भाजप मंडळाच्या वतीने भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिन शहरातील पक्ष कार्यालयात रविवारी (ता. ५) उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी पक्षाचा ध्वज फडकवून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी आपल्या मनोगतात पक्षाच्या व्यापक वाढीबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अधिक वेळ देऊन नियोजनबद्ध काम करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
याप्रसंगी कर्जत शहर मंडळाचे पदाधिकारी, पक्षाचे विविध पदाधिकारी तसेच महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी मंडळ अध्यक्ष राजेश लाड यांनी आपल्या मनोगतात हा देशातील सर्वात उंचीचा पक्ष असून, आज गावपातळीवर वाढत आहे, असे कौतुकास्पद उद्गार काढले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.