मुंबई

स्क्रिनिंगसह आहारातील बदल, वेळेवर योगा, व्यायाम आवश्यक, आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला

CD

जागतिक आरोग्यदिन ः वाढत्या आजारांवर उपचारांपेक्षा प्रतिबंध योग्य
आरोग्याबाबत वाढती जागरूकता; प्रतिबंधात्मक उपायांकडे नागरिकांचा कल

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ६ : वाढत्या जीवनशैलीजन्य आजारांच्या पार्श्वभूमीवर यंदाचा जागतिक आरोग्यदिन नागरिकांना आरोग्याबद्दल अधिक सजग बनवणारा ठरत असल्याचे चित्र आहे. पूर्वी आजार झाल्यानंतर उपचारांकडे लक्ष दिले जात असे; मात्र आता प्रतिबंधात्मक उपाययोजनांकडे नागरिकांचा कल वाढत असल्याचे आरोग्यतज्ज्ञांनी सांगितले.

सध्या मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, लठ्ठपणा यांसारख्या आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. यामागे बदललेली जीवनशैली, अनियमित आहार, ताणतणाव आणि व्यायामाचा अभाव ही प्रमुख कारणे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे आजार होण्यापूर्वीच त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी नियमित आरोग्य तपासणी (स्क्रिनिंग) करणे अत्यंत गरजेचे ठरत आहे.
........................
आधुनिक आणि अद्ययावत उपकरणांमुळे आरोग्य क्षेत्रात मोठा बदल झाला असून, चॅटजीपीटीसारख्या डिजिटल माध्यमांमुळेही आरोग्याबाबतची जागरूकता वेगाने वाढत आहे. माहिती सहज उपलब्ध होत असल्याने नागरिक अधिक सतर्क होत आहेत, ही सकारात्मक बाब आहे. मात्र, केवळ माहिती किंवा स्क्रिनिंगपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष जीवनशैलीत बदल करणे तितकेच महत्त्वाचे आहे.
डॉ. विनायक सावर्डेकर, अधीक्षक, सेंट जॉर्ज रुग्णालय
..........................
डॉक्टरांच्या मते, वेळेवर निदान झाल्यास गंभीर आजार टाळता येऊ शकतात. ३० वर्षांवरील नागरिकांनी दरवर्षी किमान एकदा रक्तदाब, साखर, कोलेस्टेरॉलची तपासणी करावी. तसेच, कर्करोगासारख्या आजारांसाठीही नियमित स्क्रिनिंग महत्त्वाचे आहे.
.........................
संतुलित आहारावर भर दिला, तर यकृतासंबंधित आजार टाळता येतील. फास्ट फूड, जंक फूड याऐवजी फळे, भाज्या, प्रथिनेयुक्त अन्न आणि पुरेसे पाणी यांचा आहारात समावेश करावा, असा सल्ला तज्ज्ञ देतात. याशिवाय दररोज किमान ३० ते ४५ मिनिटे व्यायाम, योगा किंवा चालणे आवश्यक आहे.
-डॉ. आकाश शुक्ला, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट , केईएम रुग्णालय
............................
ताणतणाव कमी करण्यासाठी ध्यानधारणा, योगा आणि पुरेशी झोप यालाही तितकेच महत्त्व आहे. आरोग्य ही केवळ शारीरिक नव्हे तर मानसिक आणि सामाजिक स्थितीही असल्याने सर्वांगीण आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
-रोहित धुरी, योग प्रशिक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak : नीट पेपरफुटी प्रकरणात आणखी एक तज्ज्ञ प्राध्यापिका रडारवर; मनीषा हवालदारचे सीबीआय चौकशीत धक्कादायक खुलासे !

Beed Crime News : बीड पुन्हा हादरले! सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती; उमेश दळवीची निघृण हत्या, बेदम मारहाणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Latest Marathi News Live Update : राज्यातील काही जिल्ह्यांना आज पावसाचा इशारा

दिवाळीनंतर नाही तर दिवाळीपूर्वीच होणार रणबीर कपूरचा रामायण सिनेमा रिलीज !

Pune News: पुण्यात आज मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; उकाड्यातून दिलासा; पुणेकरांना आज पावसाची साथ; हवामान विभागाचा अंदाज

SCROLL FOR NEXT