मुंबई

सुपर स्पेशालिटी रुग्णालय राजकीय कात्रीत

CD

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ६ : बेलापूर येथे उभारण्यात येत असलेल्या सुपर स्पेशालिटी रुग्णालय राजकीय कात्रीत सापडले आहे. या रुग्णालयासाठी सिडकोने भूखंड दिल्यानंतर त्याकरिता महापालिकेने आर्थिक तरतूद, पर्यावरण परवानगी आणि निविदा प्रक्रिया पूर्ण केली आहे, तरीसुद्धा या प्रकल्पाचे प्रत्यक्ष बांधकाम महापालिका सुरू करीत नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष वाढत आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री कार्यालयाने महापालिकेला या कामाबाबत विचारणा केली आहे, परंतु त्यावर प्रशासनाकडून कोणतीही माहिती दिली जात नसल्याने अधिकाऱ्यांवर असणारा राजकीय दबाव आता दिसत असल्याची चर्चा रंगली आहे.

बेलापूर सेक्टर १५ ए येथे आमदार मंदा म्हात्रे यांच्या पाठपुराव्यातून भव्य सुपर स्पेशालिटी रुग्णालय साकारले जात आहे. भूखंड क्र. ४ येथे २१ हजार ६२३ चौ. मी.च्या भूखंडावर रुग्णालयासहित वसतिगृह आणि इतर सुविधा मिळणार आहेत. त्याकरिता महापालिकेने १५० कोटींच्या निधीची तरतुदही केली आहे, परंतु सुरुवातीपासून या प्रकल्पाला काही राजकीय समर्थकांनी विरोध केला आहे. यात नाईक समर्थकांनी या मैदानावर क्रिकेटसाठी आरक्षित करण्याची मागणी केली होती. मात्र, या सर्व मागण्या फेटाळून लावल्यानंतर अखेर या जागेवर आता रुग्णालय उभे राहत आहे. या प्रकल्पाला राजकीय विरोध अद्याप संपलेला नाही.

अगदी महापालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत रुग्णालयाचे काम बरखास्त करण्याचा प्रयत्नही नाईक समर्थक सत्ताधाऱ्यांनी केला होता. मात्र, दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केल्यामुळे सत्ताधाऱ्यांना माघार घ्यावी लागली. आता हे प्रकरण ताजे असताना सत्ताधाऱ्यांकडून रुग्णालयाचे काम सुरू करण्यास अप्रत्यक्षरीत्या मनाई केली जात असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात दबक्या आवाजात सुरू आहे. या राजकीय दबावामुळे महापालिका प्रशासनाकडून सदरच्या रुग्णालयालाकरिता निविदा प्रक्रिया होऊनदेखील प्रत्यक्ष कामाला सुरुवात होत नसल्याने प्रशासन दबावाखाली आहे का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

सरकारच्या पत्रानंतरही कामाला सुरुवात नाही
आमदार मंदा म्हात्रे यांनी राज्य सरकारकडे पाठपुरावा करून सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचा प्रकल्प मंजूर करून आणला आहे. अगदी महाविकास आघाडी सरकारच्या काळात हा प्रकल्प मंजूर होऊनदेखील रुग्णालय उभे राहिले नसल्याने नागरिकांकडून असंतोष निर्माण होत आहे. याबाबत नुकत्याच झालेल्या अधिवेशनात म्हात्रे यांनी कामाची प्रत्यक्ष स्थिती सादर करण्याची विनंती केली होती. त्यावर २२ डिसेंबर २०२५ आणि २७ फेब्रुवारीपासून मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांनी नवी मुंबई महापालिकेकडे पत्र पाठवून कामाची माहिती विचारली आहे, परंतु अद्याप महापालिकेने रुग्णालयाच्या कामाला सुरुवात केली नसल्याने राज्य सरकारला माहितीदेखील पाठवलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: पावसाचा तांडव... कोलकाता-पंजाब सामना रद्द करावा लागला, १-१ गुणाने नेमका कोणाचा फायदा झाला?

रणवीरने केली अजून एक नक्कल, श्रेया घोषालने सुद्धा दिली साथ, व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले... हा नाही सुधारणार

Court Decision: मोठी बातमी! बाप-लेकाच्या मृत्यू प्रकरणात ९ पोलिसांना फाशीची शिक्षा; तामिळनाडूतील कोर्टाचा निर्णय

New Labour Law: कर्मचाऱ्यांची लॉटरी! उरलेल्या सुट्ट्यांवर मिळणार थेट कॅश; एकही Leave वाया जाणार नाही, काय आहेत नवे नियम?

IPL 2026 Controvarsy: बस्सsss झालं... SRH ची मालकीण काव्या मारन संतापली, BCCI कडे आवेश खानसह दोन वादग्रस्त निर्णयाची तक्रार

SCROLL FOR NEXT