मुंबई

सानपाडा–जुईनगर मंडळात भाजप स्थापना दिन उत्साहात

CD

सानपाडा-जुईनगर मंडळात भाजप स्थापना दिन उत्साहात
जुईनगर, ता. ६ (बातमीदार) : भारतीय जनता पार्टी स्थापना दिनानिमित्त (ता. ६) सानपाडा-जुईनगर मंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रम उत्साहात साजरा झाला. ‘विचार, संस्कार आणि विकासाचा दिवस’ या संकल्पनेतून साजरा करण्यात आलेल्या या उपक्रमाला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
पक्षध्वज फडकवून कार्यक्रमाची सुरुवात करत उपस्थितांनी मानवंदना देत राष्ट्रभक्तीचा संदेश दिला. या वेळी परिसरातील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान पक्षाच्या ध्येय-धोरणांवर, विचारसरणीवर आणि स्थापनेपासून आजपर्यंतच्या प्रेरणादायी प्रवासावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. बदलत्या काळात देशाच्या प्रगतीसाठी आणि समाजाच्या उन्नतीसाठी भारतीय जनता पार्टीची भूमिका किती महत्त्वाची आहे, हे ठामपणे मांडण्यात आले.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांचे आभार मानण्यात आले. या वेळी स्थानिक नगरसेवक सुनील कुरकुटे, शिल्पा ठाकूर, शैला पाटील, भाऊ भापकर आणि भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Auto Taxi Permit: फेक परमिट रिन्यूअलला लगाम लागणार! ऑटो-टॅक्सी चालकांची आता बायोमेट्रिक ओळख होणार, RTOचा कडक निर्णय

Education Recruitment Update: अशासकीय अनुदानित महाविद्यालयांत ५,०१२ सहाय्यक प्राध्यापक भरतीला मंजुरी; आरक्षण अंमलबजावणीसाठी विशेष प्रशिक्षण

Latest Marathi News Live Update : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणार नाही, जय पवार यांची माहिती

पालघरमध्ये मोठा राजकीय भूकंप! शिवसेना-भाजपला खिंडार; बड्या नेत्यांचा बविआमध्ये प्रवेश

11th Admission : अकरावी प्रवेशासाठी १२.४९ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी; पहिल्या फेरीची निवड यादी शुक्रवारी जाहीर

SCROLL FOR NEXT