खालापुरातील धरणात पुरेसा पाणीसाठा
गरज पडल्यास व्यावसायिक उपशावर नियंत्रण
खालापूर, ता. ६ (बातमीदार) ः मागील वर्षी झालेला समाधानकारक पाऊस खालापूर तालुक्यातील धरणांसाठी लाभदायक ठरला असून, एप्रिल महिना सुरू झाला तरी सिंचन, पेयजल आणि औद्योगिक वापरासाठी धरणांमध्ये पाणीसाठा उपलब्ध आहे. मात्र, पाणीटंचाई भासू नये, यासाठी प्रशासनाकडून व्यावसायिक पाणी उपशावर लक्ष ठेवले जात आहे.
तालुक्यातील लघु पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत असलेली भिलवले, कलोते मोकाशी आणि डोणवत ही तीनही धरणे २०२५ च्या पावसाळ्यात १०० टक्के भरली होती. सिंचनासाठी, औद्योगिक वापरासाठी आणि अनेक गावाच्या पेयजल योजना धरणावर अवलंबून आहे. भिलवले धरणातील कालव्याचा फायदा चौक भागातील उन्हाळी शेती करणाऱ्या भाजीपाला पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना होतो. कलोते मोकाशील धरणाचा उजवा आणि डावा कालवामुळे खालापूरचा ग्रामीण भाग आणि शहरी भागातील पाण्याचा तसा शेतीचा पाण्याचा प्रश्न मिटतो. याशिवाय कलोते मोकाशी धरणातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे इमॅजिका पार्क देखील पाणी मोठ्या प्रमाणात उचलते. खोपोली पेण मार्गावर असलेले डोणवत धरणावर १४ गावच्या पाणी योजना असून या भागातील कारखान्याची दररोजची लाखो लिटर पाण्याची मागणी डोणवत धरण पूर्ण करते. सध्या भिलवले धरणात ७५ टक्के उपयुक्त पाणीसाठा, कलोते धरणात ८० टक्के आणि डोणवत धरणात ५० टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. यंदा भिलवले आणि कलोते धरणातून सिंचनासाठी कालव्याला मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले असून व्यावसायिक उपसा देखील नियमित सुरू आहे.
व्यावसायिक उपशाचे गणित
कलोते धरणातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे इमॅजिका पार्क दिवसाला पंधरा लाख लिटर पाणी उचलते. उरलेसुरलेले पाणी धरणानजीक असलेले फार्म हाऊस, हॉटेल देखील प्रचंड उपसा करतात. डोणवत धरणातून या भागातील कारखाने दिवसाला २५ लाख लिटर पाण्याचा उपसा करते. शिवाय १४ गावाच्या पेयजल योजना आहेत. पुरेसा पाणीसाठा असला तरी यंदा अल निनोचे संकट अंदाज वर्तवला आहे. तसे झाल्यास पाणीटंचाई उग्ररूप धारण करण्याची शक्यता आहे .त्यामुळे धरणातून सुरू असलेला व्यावसायिक कारणासाठीचा उपसावर आताच नियंत्रण आवश्यक आहे.
व्यावसायिक कारणासाठी धरणातील पाणीसाठा उपशावर एप्रिल मे महिन्यात मर्यादा आणणे आवश्यक आहे. डोणवत धरणात ५० टक्के पाणीसाठा शिल्लक असून पावसाला अद्याप दोन महिन्यापेक्षा अधिकचा कालावधी आहे . शिवाय सीएसआर फंडातून धरणातील गाळ उपसा केल्यास पाणीसाठा वाढण्यासाठी मदत होईल या दृष्टीने प्रशासनाने प्रयत्न करावे
- सुरेश गावडे, माहिती अधिकार कार्यकर्ता
धरणात सध्या मुबलक पाणीसाठा आहे. सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले असून व्यावसायिकांना शासनाकडून मंजूर कोट्याप्रमाणे पाणी देण्यात येत आहे. सध्या तरी कोणत्याही प्रकारची कपात करण्यात आलेली नाही.
- निलेश देशमुख, अभियंता पाटबंधारे विभाग, कर्जत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.