मुंबई

पनवेल-अलिबाग मार्गावर रात्रीच्या वेळेस अपुऱ्या बससेवेमुळे ग्रामीण भागातील प्रवाशांचे हाल

CD

पनवेल-अलिबाग मार्गावर बससेवेचा बोजवारा
रात्रीच्या वेळी ग्रामीण भागातील प्रवाशांचे हाल
पोयनाड, ता. ६ (बातमीदार) : नेहमीच वर्दळीच्या पनवेल-अलिबाग मार्गावर सध्या रात्री आठनंतर अपुऱ्या बससेवांमुळे अलिबाग तालुक्याच्या ग्रामीण भागातील प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. रात्री आठ नंतर पनवेल-अलिबाग मार्गावर जास्त बसेस नसल्याने प्रवाशांना मुंबई, ठाणे, बोरिवली येथून येणाऱ्या बसेसवर अवलंबून राहावे लागते. एकीकडे एसटी महामंडळाने विविध योजना आणि सवलतींच्या माध्यमातून प्रवाशांना एसटीकडे आकर्षित करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. दुसरीकडे या नेहमीच्या वर्दळीच्या मार्गावर रात्रीच्या वेळेस एसटी बस नसल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे.
अलिबाग-पनवेल-अलिबाग या मार्गावर सर्वंथांबे घेणाऱ्या गाड्या आहेत. मात्र, त्याचे देखील वेळापत्रक नेहमीच कोलमडलेले असते. मात्र मुंबई, नवी मुंबई आणि पनवेल तसेच तळोजा परिसरातून कामावरून येणाऱ्या आणि अलिबाग तालुक्यातील पोयनाड, शहापूर, शहाबाज, कुर्डुस, तांडवागळे, कोपर, सुतारपाडा, हाशिवरे, वाघ्रण, कोळघर येथे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असते. आणि या प्रवाशांना एसटीचाच एकमेव आधार असतो. सध्या रात्रीनंतर पनवेल येथून अलिबागकडे जाणाऱ्या बसेस अपुऱ्या असल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे रात्रीनंतर पनवेल-अलिबाग मार्गावर सर्व थांबे घेणाऱ्या बसेस एसटी महामंडळाने वाढवाव्यात, अशी मागणी या मार्गावरून प्रवास करणारे प्रवासी करताहेत.

विनावाहक विनाथांबा गाड्याच जास्त
अलिबाग-पनवेल-अलिबाग या मार्गावर विनावाहक विनाथांबा या गाड्या जास्त आहेत. त्याउलट सर्वंथांबे घेणाऱ्या गाड्या कमी प्रमाणात आहेत. विनावाहक विनाथांबा गाड्यांचा ग्रामीण भागातील प्रवाशांना काहीच उपयोग नसल्याने सर्वंथांबे घेणाऱ्या गाड्या वाढविण्याची मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: पावसाचा तांडव... कोलकाता-पंजाब सामना रद्द करावा लागला, १-१ गुणाने नेमका कोणाचा फायदा झाला?

रणवीरने केली अजून एक नक्कल, श्रेया घोषालने सुद्धा दिली साथ, व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले... हा नाही सुधारणार

Court Decision: मोठी बातमी! बाप-लेकाच्या मृत्यू प्रकरणात ९ पोलिसांना फाशीची शिक्षा; तामिळनाडूतील कोर्टाचा निर्णय

New Labour Law: कर्मचाऱ्यांची लॉटरी! उरलेल्या सुट्ट्यांवर मिळणार थेट कॅश; एकही Leave वाया जाणार नाही, काय आहेत नवे नियम?

IPL 2026 Controvarsy: बस्सsss झालं... SRH ची मालकीण काव्या मारन संतापली, BCCI कडे आवेश खानसह दोन वादग्रस्त निर्णयाची तक्रार

SCROLL FOR NEXT