मुंबई

पार्थिव दीक्षितचे हे कसे ओळखायचे?

CD

ओमानमध्‍ये जहाज हल्ला प्रकरण

पार्थिव दीक्षितचे हे कसे ओळखायचे?

कुटुंबाकडून डीएनए चाचणीची मागणी; न्यायालयाने मागितले स्पष्टीकरण

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ६ : ओमानच्या किनाऱ्याजवळ मार्चमध्ये व्यापारी जहाजावर झालेल्या संशयित हल्ल्यात मृत्यू झालेला खलाशी दीक्षित सोलंकीचेच पार्थिव आहे हे ओळखायचे कसे? अशी विचारणा सोमवारी (ता. ६) दीक्षितच्या कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात केली. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी त्यांनी डीएनए चाचणीची मागणीही केली. त्याची दखल घेऊन न्यायालयाने नौकानयन महासंचालनालयाकडे स्पष्टीकरण मागवले आहे.

दीक्षित सोलंकी यांचे वडील अमृतलाल सोलंकी आणि बहीण मिताली सोलंकी यांनी याचिका केली आहे. त्यावर मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर प्राथमिक सुनावणी झाली. त्या वेळी रविवारी (ता. ५) पार्थिव भारतात पोहोचले आहे; परंतु ते भारतात परत आणण्याची प्रक्रिया हाताळणाऱ्या कंपनीने कुटुंबीयांना आधी तक्रार दाखल करण्यास आणि डीएनए चाचणी करून पार्थिव ताब्यात घेण्यास सांगितले आहे. कारण १ मार्चला ज्या वेळी जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला झाला, तेव्हापासून या संपूर्ण परिस्थितीची ज्या प्रकारे हाताळणी करण्यात आली आहे, त्यावरून या प्रकरणाबाबत संशय निर्माण झाल्याची माहिती कुटुंबीयांच्या वतीने वकील प्रज्ञा तळेकर यांनी न्यायालयाला दिली. त्याची दखल घेऊन नौकानयन महासंचालनालयाच्या उपमहासंचालकांकडून माहिती घेऊन भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. पुढील सुनावणी मंगळवारी (ता. ७) हाेणार आहे.
------
डीएनए चाचणी का आवश्यक?
मुळात पार्थिव म्हणून जळालेल्या अवस्थेत हाडांचे चार-पाच तुकडेच आहेत. पूर्ण मृतदेह नसल्यामुळे त्याची ओळख पटवणे अशक्य आहे. त्यामुळे डीएनए चाचणी होणे गरजेचे असल्याची माहिती तळेकर यांनी न्यायालयाला दिली. त्यानंतरच कुटुंबीय अंतिम संस्कारांची प्रक्रिया पूर्ण करू शकतील. त्यामुळे याचिकाकार्त्यांनी सोमवारी न्यायालयात एक अंतरिम अर्ज दाखल करून एफआयआर नोंदवण्याचे आणि पार्थिवाच्या डीएनए चाचणीचे आदेश देण्याची मागणी केली होती.
----
काय प्रकरण?
पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ओमानच्या किनाऱ्याजवळ ‘एमटी एमकेडी व्योम’ या तेलवाहू जहाजावर स्फोटकांनी भरलेल्या ड्रोनने धडक दिली. या हल्ल्यात कांदिवली येथे राहणाऱ्या दीक्षित सोलंकीचा मृत्यू झाला हाेता. त्याचे पार्थिव परत मिळावे म्हणून कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याचिकेत सोलंकी कुटुंबीयांनी या प्रकरणाशी संबंधित सर्व तपास आणि फॉरेन्सिक अहवालांची माहितीही त्यांना देण्याची मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: अर्थखात्यासाठी राष्ट्रवादीची जोरदार लॉबिंग; चार महिन्यांनंतरही निर्णय रखडला, खाते परत मिळवण्यासाठी पक्ष आक्रमक

Indian Railways Hydrogen Train: देशातील पहिला प्रयोग हरियानात! डिझेलविना, प्रदूषणविरहित धावणार हायड्रोजन रेल्वे; रेल्वे मंत्रालयाचा हिरवा कंदील

मोठी बातमी! ग्रामपंचायतींचा नोव्हेंबरअखेर वाजणार बिगुल? सरपंच आरक्षण जाहीर, आता सदस्यांची आरक्षण सोडत १२ जूनला; मतदार यादी ‘या’ महिन्यात होणार अंतिम

येत्या जून महिन्यात बनतोय अत्यंत खतरनाक खप्पर योग ! रातोरात बदलणार नशीब; कुणाला शुभ तर कुणाला अशुभ घ्या जाणून

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SCROLL FOR NEXT