‘पीसीएम’ सीईटीच्या तारखेत बदल
मुंबई, ता. ६ : केंद्रीय लोकसेवा आयोगासह ‘एनडीए’ आदी परीक्षा १२ एप्रिल रोजी देशभरात आयोजित करण्यात आल्याने राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे घेतल्या पीसीएम सीईटी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. पीसीएमची सीईटी ११ ते २० एप्रिलदरम्यान आयोजित करण्यात आली आहे, मात्र याचदरम्यान रविवारी, १२ एप्रिल रोजी राष्ट्रीय स्तरावर युपीएससी, एनडीए, आणि एनए या परीक्षांसह युपीएससी सीडीएस आदी परीक्षा होत आहेत. त्यामुळे पीसीएमची सीईटीच्या परिक्षाच्या तारखांमधून १२ एप्रिल हा दिवस वगळण्यात आला आहे. तसेच विद्यार्थ्यांनी दिनांक ५ एप्रिल रोजी दुपारी २.०० नंतर सुधारित सिटी इंटीमेशन स्लिप डाऊनलोड करावी (जिल्हा आणि परीक्षेच्या तारखेचा उल्लेख असलेली) व दिनांक ७ एप्रिल २०२६ रोजी परीक्षा केंद्राचे नेमके नाव, पत्ता, परीक्षेची तारीख आणि जिल्हा अशा तपशीलांसह असलेले प्रवेशपत्र डाऊनलोड करावे असे आवाहन सीईटी कक्षाने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.