मुंबई

‘विराज’ विस्तारावरून तणाव

CD

‘विराज’चे भवितव्य आज ठरणार
जनसुनावणीत स्थानिकांच्या भूमिकेकडे लक्ष

बोईसर, ता. ७ (वार्ताहर) : तारापूर औद्योगिक पट्ट्यातील विराज प्रोफाइल्स प्रा. लि. कंपनीच्या प्रस्तावित विस्तार प्रकल्पाला स्थानिकांनी विरोध केला आहे. त्यामुळे आज होणाऱ्या जनसुनावणीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
मान येथील एसआरएम कारखाना परिसरात सकाळी ११ वाजता ही सुनावणी होणार आहे. कंपनीकडून २.२ दशलक्ष क्षमतेचा प्रकल्प, चार-पाच हजार रोजगारनिर्मिती, ‘जवळपास शून्य ते पूर्ण शून्य’ उत्सर्जनाचे उद्दिष्ट आणि ३४४ कोटी रुपयांच्या पर्यावरणीय गुंतवणुकीचे दावे करण्यात आले आहेत. सामाजिक दायित्व उपक्रमांतर्गत आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण, कौशल्य विकास व पायाभूत सुविधा उभारणीचे काम सुरू असल्याचा दावा कंपनीने केला असला, तरी पर्यावरण, पारदर्शकता तसेच स्थानिकांच्या तक्रारींवर समाधानकारक उत्तरे मिळाली नसल्याने जनसुनावणीवेळी नवा वाद उद्भवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
-----------------------------------
आमदार तरे आक्रमक
तारापूर औद्योगिक पट्ट्यातील विराज कंपनीच्या १०० एकर विस्तारीकरण प्रकल्पावरून वाद चिघळला आहे. या पार्श्वभूमीवर बोईसरचे आमदार विलास तरे यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला इशारा दिला आहे. तसेच जनसुनावणी केवळ औपचारिकता असून पर्यावरणीय परिणाम मूल्यांकन अहवाल सार्वजनिक करणे, ग्रामस्थांची संमती घेणे, नियमभंगावर कारवाईची मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Corporators Not Reachable : विधानपरिषदेचे राजकारण तापलं! काँग्रेसचे ५० ते ६० नगरसेवक नॉट रीचेबल, भाजप आमदाराचा दावा

12 Years of PM Modi नरेंद्र मोदींनी पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली तेव्हा पेट्रोल-डिझेलचे दर किती होते?

Blood Group Stroke Risk: ‘या’ रक्तगटाच्या लोकांना स्ट्रोकचा जास्त धोका? वाचा शास्त्रज्ञांचं नेमकं म्हणणं काय

Ganga Dussehra: वर्षातून एकदा होतो गंगा आणि नर्मदेचा संगम! काय आहे 'भयडा प्रसाद' आणि त्याची रेसिपी?

Mumbai: महापालिका जागा सील करू शकत नाही, थकीत मालमत्ता कर वसूलीवर न्यायालयाचा निर्वाळा

SCROLL FOR NEXT