मुंबई

वरले वाडीतील पाणीटंचाईवर मात

CD

वरलेवाडीतील पाणीटंचाईवर मात

वाडा, ता. ७ (बातमीदार) ः वाडा तालुक्यातील वरले ग्रामपंचायत हद्दीतील कातकरीवाडीला सहा महिन्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांनंतर स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांना वरले ग्रामपंचायतीविरोधात आंदोलनाचे हत्यार उपसले होते.
वरले ग्रामपंचायत हद्दीतील कातकरीवाडीतील नागरिकांना विहिरीतील दूषित पाणी पिण्यास भाग पडत होते. तर दुसऱ्या बाजूला कूपनलिकेतील स्वच्छ पाणी नळ योजनेद्वारे गावातील काही मोजक्या लोकांनाच मिळत होते. या अन्यायाविरोधात श्रमजीवी संघटनेचे जिल्हा सचिव किशोर मढवी, तालुका अध्यक्ष भरत जाधव, तालुका सचिव सूरज दळवी, तालुका उपाध्यक्ष सुजाता पारधी, बाळू लहांगे, वाडा शहर अध्यक्ष योगिता गावित, तालुका महिला ठिणगी प्रमुख सुगंधा विघ्ने, तालुका महिला ठिणगी उपप्रमुख मिरा टोकरे, प्रतिभा वाघ यांच्यासह इतर कार्यकर्ते सभासदांनी लढा पुकारला होता. अखेर त्यांच्या प्रयत्नाला यश आले आहे.

Donald Trump: ''आजच्या रात्रीत संपूर्ण संस्कृती नष्ट होईल'', डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा

RR vs MI Live: मुंबई इंडियन्स - राजस्थान रॉयल्स सामना केव्हा सुरू होणार? षटकं कमी होत चालली, मॅच ५-५ ओव्हर्सची होणार? Cut-off time जाहीर

मोठी बातमी! राज्यात अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा, आज पुन्हा ११ आयएएस अधिकाऱ्यांची बदली

Latest Marathi News Live Update :: नाशिकच्या चांदवडमध्ये पाणीटंचाईने संतप्त ग्रामस्थांनी उद्रेक

Pune Robbery: निगडे गावातील जबरी चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; दोघा आरोपींना पोलीस कोठडी

SCROLL FOR NEXT