मुंबई

उल्हासनगरात रस्ते खोदकामांचा फटका

CD

दिनेश गोगी : सकाळ वृत्तसेवा
उल्हासनगर, ता. ७ : शहरात विविध ठिकाणी सुरू असलेल्या रस्ते खोदकामांमुळे वाहतुकीचा बोजा उडाला आहे. रिक्षाचालकांना लांबच्या फेऱ्यांनी प्रवास करावा लागत आहे. परिणामी, शेअरिंग रिक्षांचे भाडे वाढले असून संबंधित मार्गांवरील व्यापाऱ्यांचे व्यवसायही ठप्प पडल्याची स्थिती आहे.

मागील वर्षी कॅम्प क्रमांक ४ येथील लालचक्की चौक ते वीर सावरकर पुतळा या मार्गावर सांडपाणी वाहिनीच्या कामासाठी दीर्घकाळ खोदकाम करण्यात आले होते. त्यामुळे हा रस्ता अनेक महिने बंद राहिला. त्याचप्रमाणे दहाचाळ रोडवरील कामामुळे कुर्ला कॅम्पकडे जाणाऱ्या रिक्षांना भाटियामार्गे लांब फेरी मारावी लागत होती. या वाढीव अंतरामुळे त्या वेळी रिक्षा भाड्यात पाच रुपयांची वाढ करण्यात आली होती.

सध्या लालचक्की चौक ते छत्रपती संभाजी चौक या मार्गाचे काम तीन-चार महिन्यांपासून सुरू आहे. त्यामुळे स्टेशन ते संभाजी चौक या दरम्यानची रिक्षा सेवा काही काळ बंद होती. प्रवाशांना व्हिनसजवळील स्मशानभूमी मार्ग किंवा दहाचाळ मार्गे वळसा घ्यावा लागत असल्याने येथेही भाडेवाढ लागू करण्यात आली आहे. आता एक मार्ग सुरू झाल्याची माहिती मिळत असली तरी दुसऱ्या मार्गाचे काम अद्याप प्रगतीपथावर आहे. सध्या शांतीनगर स्मशानभूमी परिसरातही खोदकाम सुरू असून, उल्हासनगर महानगरपालिका ते चोपडा कोर्ट आणि विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रिक्षांना लांब फेऱ्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे थेट रिक्षासाठी प्रवाशांना अधिक भाडे मोजावे लागत आहे.

अनेकांचे व्यवसाय ठप्प 
खोदकामांमुळे रस्त्यालगतच्या दुकानदारांचे मोठे नुकसान झाले आहे. ग्राहकांची वर्दळ घटल्याने अनेकांचे व्यवसाय ठप्प पडले आहेत.  


नागरिकांच्या सोयीसाठीच ही कामे सुरू आहे. सध्या अडचणी येत असल्या तरी बहुतांश कामे अंतिम टप्प्यात आहेत. आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहराला लवकरच चांगले रस्ते मिळतील.
 - डॉ. धीरज चव्हाण, अतिरिक्त आयुक्त, उल्हासनगर पालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Rice Export : तणावातही भारतीय तांदळाला इराणमध्ये मागणी; युद्धजन्य परिस्थितीवर मात करत उलाढाल, ६५ लाख टन निर्यातीचा अंदाज

MS Dhoni Fitness: धोनीला तंदुरुस्त होण्यास किती वेळ लागेल सांगणे अवघड, ब्रेव्हिस...; CSK च्या ताफ्यातून धक्कादायक बातमी समोर

Pune Shirur crime News: शिरूरमध्ये मातृत्वाला काळिमा; दुसऱ्या लग्नात अडथळा ठरणाऱ्या ११ महिन्याच्या यशचा खून करून विहिरीत टाकल्याची कबुली

SCROLL FOR NEXT