मुंबई

पालिका निवासी डॉक्टरांचा महागाई भत्ता रखडला

CD

पालिका निवासी डॉक्टरांचा महागाई भत्ता रखडला
निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा, २१ महिन्यांपासून थकबाकी प्रलंबित
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : मुंबई महापालिकेच्या केईएम, नायर, सायन आणि कूपर रुग्णालयांमध्ये कार्यरत निवासी डॉक्टरांनी महागाई भत्ता वाढीच्या अंमलबजावणीतील विलंबाबाबत नाराजी व्यक्त करत प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिला आहे. महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्सने यासंदर्भात तीव्र भूमिका घेतली आहे.
महाराष्ट्र शासनाने १ जुलै २०२४, १ जानेवारी २०२५ आणि १ जुलै २०२५ पासून लागू होणाऱ्या महागाई भत्ता वाढीबाबत शासन निर्णय जारी केले असतानाही, पालिका रुग्णालयांतील निवासी डॉक्टरांना अद्याप त्याचा लाभ मिळालेला नाही. सध्या डॉक्टरांना सुमारे ४४३ टक्के दराने महागाई भत्ता मिळत असून, शासनमान्य दर ४७४ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे जवळपास ३१ टक्क्यांचा फरक निर्माण झाला असून, गेल्या सुमारे २१ महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे.
या मुद्द्यावर पालिका मार्डकडून जुलै २०२५ पासून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. अनेक पत्रव्यवहार, बैठका आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करूनही अंतिम निर्णय प्रलंबितच आहे. हा विषय महानगर उपआयुक्त (सार्वजनिक आरोग्य) स्तरावर चर्चिला गेला असून, अधिष्ठात्यांच्या बैठकीत मांडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
६ एप्रिल २०२६ रोजी संघटनेने महानगर आयुक्त, उपआयुक्त (सार्वजनिक आरोग्य), अतिरिक्त आयुक्त तसेच सर्व प्रमुख रुग्णालयांच्या अधिष्ठात्यांना सविस्तर पत्र सादर केले. या वेळी डॉ. चिन्मय केळकर, डॉ. दिग्विजय जाधव, डॉ. अमर आगमे, डॉ. कौस्तुभ कोकिल आणि डॉ. शुभम सोलंके उपस्थित होते. तसेच उपआयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त यांची प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा करण्यात आली असून, ९ एप्रिल रोजी यासंदर्भात बैठक बोलावण्यात आली आहे. उपमहापौर संजय घाडी यांच्याशीही याबाबत चर्चा करण्यात आली.
निवासी डॉक्टर हे मुंबईच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा कणा मानले जातात. २४x७ सेवा देणाऱ्या या डॉक्टरांना शासनमान्य आर्थिक हक्कापासून वंचित ठेवणे गंभीर असल्याचे मार्डने नमूद केले आहे.

अधिकृत परिपत्रक जाहीर करा
गुरुवारपर्यंत अधिकृत परिपत्रक जाहीर करण्याची मागणी संघटनेने केली असून, तसे न झाल्यास शुक्रवारपासून टप्प्याटप्प्याने आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. प्रशासनाने या प्रश्नावर तत्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणी डॉक्टरांकडून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : पुणे शहरात उद्यापासून प्रतिबंधात्मक आदेश लागू; परवानगीशिवाय सभा, मिरवणुकांना बंदी

Chandoli Dam Tourists : चांदोली धरणावर दारू पिऊन धिंगाणा घालताय? सावधान! पोलिस, धरण प्रशासन ॲक्शन मोडवर; मद्यधुंद पर्यटकांवर अंकुश

Ambenali Ghat Accident : महाबळेश्वरच्या आंबेनळी घाटात भीषण दुर्घटना ! स्कॉर्पियो ५०० फूट खोल दरीत कोसळली, ८ जणांचा जागीच मृत्यू

Petrol-Diesel Price Today : पेट्रोल-डिझेल दरवाढीचा चौथा धक्का! सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे ताजे दर

सकाळच्या गडबडीतही फिट राहण्यासाठी झटपट, हेल्दी आणि एनर्जीने भरलेला पीनट-बटर-बनाना रॅप, ५ मिनिटांत होतो तयार

SCROLL FOR NEXT