मुंबई

जोगेश्वरी पूर्वेत सेव्हरेज कामामुळे रस्ता बंद

CD

जोगेश्वरी पूर्वेत सांडपाण्याच्या कामामुळे रस्ता बंद
नागरिक व विद्यार्थ्यांची कोंडी

जोगेश्वरी, ता. ७ (बातमीदार) : जोगेश्वरी पूर्व येथील आयकर वसाहतीजवळील मार्गालगतच्या शनी महात्म मंदिर मार्गावर सुरू असलेल्या सांडपाण्याची वाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी संपूर्ण रस्ता हा अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
मागील महिन्याच्या ३१ मार्चपासून हे काम सुरू करण्यात आले आहे. तेव्हापासून रस्त्यावर खोदकाम करून दगड मातीचे मोठे ढिगारे तसेच ठेवण्यात आलेत. तसेच हा मार्ग वाहतुकीसाठी बंद असल्याचे फलक लावत तो फक्त हलक्या वाहनांसाठी खुला ठेवण्यात आला आहे. आता या गोष्टीला अनेक दिवस झाले असून, हे काम नेमकं किती दिवस चालणार, असा प्रश्न येथील स्थानिक नागरिकांना पडला आहे.
या खोदकामामुळे स्थानिकांना प्रवास करताना अडचणींचा सामना करवा लागत आहे. खासकरून ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांना या मार्गावरून चालताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तसेच जोगेश्वरी रेल्वे स्थानक गाठण्यासाठी अनेक वाहनधारकांना गांधी नगर मार्केट मार्गाने वळसा घालून पुढे जावे लागत असल्याने येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होतानाचे चित्र आहे. हा रस्ता बंद असल्याने आपत्कालीन सेवांनाही अडथळे निर्माण होण्याची शक्यता स्थानिकांकडून वर्तवली जात आहे. त्यामुळे पालिकेच्या के-पूर्व विभागाने हे काम युद्धपातळीवर दिवस-रात्र सुरू ठेवून पूर्ण करावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Hockey Player : अवघ्या २३ वर्षीय राज्यस्तरीय हॉकीपटूने घेतला गळफास, उपचारासाठी प्रयत्न केले पण...

अंकिता वालावलकरच्या आंब्याच्या पेट्या चोरीला; यूपीच्या कुरिअरवाल्याने पळवलं सामान; इतक्या हजारांचं नुकसान

Latest Marathi News Live Update : श्री संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्यांची शिकार प्रकरण उघड; 6 आरोपी ताब्यात

Pimpri Chinchwad News : महापालिकेच्या मल्टिस्पेशालिटी रुग्णालयांमुळे रुग्णांना कमी खर्चात मिळतात उत्तम उपचार

Pakistan Lockdown: आज रात्रीपासून पाकिस्तानमध्ये लॉकडाऊन! पंतप्रधान शहबाज शरीफ यांची घोषणा

SCROLL FOR NEXT