मुंबई

१५ कंत्राटी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ

CD

२३० मुलींचे भवितव्य अंधारात
कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील कर्मचाऱ्यांची सेवासमाप्ती

जव्हार, ता. ७ (बातमीदार) ः तालुक्यातील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील १५ शिक्षक, शिक्षकेतर तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती केली आहे. या निर्णयामुळे २३० मुलींचे भवितव्य धोक्यात आले आहे.
शिक्षण व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी, समाजातील शेवटच्या घटकाला मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने समग्र शिक्षा अभियानांतर्गत २००३ मध्ये डेटा एन्ट्री ऑपरेटर, विशेष शिक्षक, कनिष्ठ सहाय्यक, गृहपाल, लेखापाल, समन्वयक अशा विविध १५ पदांवर कंत्राटी तत्त्वावर कर्मचारी भरण्यात आले होते. या विभागात अनेकांनी २० ते २३ वर्षे सेवा दिली आहे. दरवर्षी एक महिन्याचा सेवाखंड देऊन त्यांना पुनर्नियुक्ती दिली जात असे; मात्र यंदा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या प्रकल्प संचालकांनी सेवा समाप्तीबाबत पालघर जिल्हा परिषदेला पत्र दिल्याने पन्नाशीत पोहोचलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
--------------
मागण्यांसाठी आंदोलन
या योजनेमध्ये आयडी विभागातील तीन हजार कर्मचाऱ्यांना शासनाने सेवेत सामावून घेतले आहे. तर कस्तुरबा शाळेमध्ये मुलींच्या शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवासमाप्तीचे आदेश दिले आहेत. यामुळे सर्व कर्मचाऱ्यांनी मुंबईतील आझाद मैदान मुंबई येथे उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे.
-------------------------
कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीची नोटीस दिली आहे. त्याबाबत शिक्षण विभागाकडून माहिती घेऊन वरिष्ठ कार्यालयास कळवले जाईल.
- अक्षय पगार, गटविकास अधिकारी, जव्हार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: ''आजच्या रात्रीत संपूर्ण संस्कृती नष्ट होईल'', डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा

RR vs MI Live: मुंबई इंडियन्स - राजस्थान रॉयल्स सामना केव्हा सुरू होणार? षटकं कमी होत चालली, मॅच ५-५ ओव्हर्सची होणार? Cut-off time जाहीर

मोठी बातमी! राज्यात अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा, आज पुन्हा ११ आयएएस अधिकाऱ्यांची बदली

Latest Marathi News Live Update :: नाशिकच्या चांदवडमध्ये पाणीटंचाईने संतप्त ग्रामस्थांनी उद्रेक

Pune Robbery: निगडे गावातील जबरी चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; दोघा आरोपींना पोलीस कोठडी

SCROLL FOR NEXT