मुंबई

आदिवासी समाजाच्या कार्यालयावर ताबा

CD

आदिवासी समाजाच्या कार्यालयावर ताबा
हक्काच्या जागेत व्यवसाय; ७५ वर्षीय ज्येष्ठाचा २७ वर्षांपासून लढा

ठाणे, ता. ७ (बातमीदार) : आदिवासी समाजाच्या विकासासाठी उभारलेले कार्यालय समाजहितासाठी परत मिळावे, यासाठी एका ७५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा गेल्या २७ वर्षांपासून लढा सुरू आहे. हे कार्यालय दीर्घकाळापासून बिगर आदिवासी व्यक्तींच्या ताब्यात असल्याने समाजाच्या विकासकामांना खीळ बसली आहे. हे कार्यालय त्वरित मुक्त करून मूळ संस्थेच्या ताब्यात द्यावे, अशी मागणी मल्हार कोळी आदिवासी समाज उन्नती मंडळाने ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

मंडळाचे सचिव वसंत भोईर यांनी दिलेल्या माहितीनुसार, १९८३ मध्ये या मंडळाची धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी केली होती. लोकमान्य नगर (पाडा नं. २) येथील कार्यालयातून सुरुवातीची १६ वर्षे समाजाच्या सर्वांगीण विकासाची कामे व्यवस्थित सुरू होती. मात्र, त्यानंतर मंडळाचा कारभार बिगर आदिवासी व्यक्तींच्या हाती गेला आणि संस्थेला उतरती कळा लागली. संबंधित व्यक्तींनी संस्थेचे कार्यालय एका बिगर आदिवासी व्यावसायिकाला भाड्याने देऊन आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप भोईर यांनी केला आहे.

प्रशासकीय आदेशाची पायमल्ली
गेल्या २६ वर्षांत या संस्थेचा कोणताही हिशोब किंवा माहिती धर्मादाय आयुक्तांना देण्यात आली नव्हती. याविरोधात दाद मागितल्यानंतर, धर्मादाय आयुक्तांनी ३० जून रोजी मंडळाचा कारभार पुन्हा जुन्या कमिटीच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले होते. मात्र, तरीही संस्थेचे कार्यालय ताब्यात देण्यास टाळाटाळ केली जात आहे.

विद्यार्थ्यांचे नुकसान
कार्यालय ताब्यात नसल्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी राबवले जाणारे उपक्रम आणि समाजकार्यात अडथळे येत आहेत. समाजाच्या पैशातून घेतलेली ही जागा पुन्हा समाजाच्याच कामासाठी मिळावी, या मागणीसाठी वसंत भोईर यांनी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. भ्रष्ट प्रवृत्तींपासून हे कार्यालय मुक्त करून न्याय मिळवून देण्याची विनंती या वेळी करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipith Highway villages list : शक्तिपीठ महामार्ग जाणाऱ्या गावांची यादी आली समोर, कोल्हापूर ७३ तर सांगली जिल्ह्यातील २५ गावांचा समावेश

France Gold: फ्रान्सची ‘गोल्ड गेम’ स्ट्रॅटेजी! अमेरिकेत ठेवलेल्या सोन्यातून कमावले तब्बल 1.37 लाख कोटी; काय होता प्लॅन?

झी मराठीच्या मालिकांची वेळ बदलली! 'लक्ष्मीनिवास' आणि सावळ्याची जणू सावली' आता दुपारी दिसणार; पण किती वाजता?

Latest Marathi News Live Update : पुण्यात कोपा मॉलला धमकी! व्यवस्थापनाच्या ईमेलवर संशयास्पद मेल, पोलिसांत गुन्हा दाखल

सुरकुत्या,पिंपल्स, निस्तेज त्वचा? ‘हे’ 5 सुपरफूड्स वाढवतील कोलेजन अन् देतील ग्लो!

SCROLL FOR NEXT