वाशी, ता. ७ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेच्या परवाना विभागाने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये महसूल संकलनात उल्लेखनीय झेप घेतली आहे. यंदा २० कोटी ५८ लाखांचा महसूल पालिकेच्या तिजोरीत जमा केला आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षाच्या तुलनेत पाच कोटी ८० लाखांची वाढ नोंदवण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत ही मोठी वाढ असून, कडक अंमलबजावणीचा हा थेट परिणाम असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगितले जात आहे.
महापालिकेच्या परवाना विभागामार्फत जाहिरात परवाने, फेरीवाल्यांचे परवाने, विविध व्यावसायिक परवाने, साठा परवाने, कारखाना व उद्योग परवानगी शुल्क, सिनेमागृह शुल्क, तसेच चित्रीकरणासाठी परवानग्या दिल्या जातात. या विविध माध्यमांतून पालिकेला मोठ्या प्रमाणावर महसूल प्राप्त होतो. मुंबईतील होर्डिंग दुर्घटनेनंतर नवी मुंबईतही बेकायदा होर्डिंगविरोधात कठोर कारवाई करण्यात आली. उपआयुक्त डॉ. राहुल गेठे यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या या मोहिमेमुळे अनेक अनधिकृत होर्डिंग हटवण्यात आले. परिणामी, जाहिरातदारांनी नियमांनुसार परवाने घेण्यास सुरुवात केली. तसेच, अनधिकृत व्यवसाय करणाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात आल्याने अनेक व्यावसायिकांनी स्वखुशीने परवाने घेण्यासाठी पालिकेकडे धाव घेतली.
या सर्व कारवाई आणि नियोजनबद्ध कामकाजामुळे परवाना विभागाच्या महसुलात लक्षणीय वाढ झाली असून, २०२५-२६ मधील २० कोटी ५८ लाखांचा महसूल हा मागील चार वर्षांतील सर्वोच्च ठरला आहे. प्रशासनाच्या प्रभावी धोरणांमुळे आगामी काळातही महसूल वाढीचा हा कल कायम राहण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मागील पाच वर्षांतील कराची आकडेवारी
वर्ष वसुली (कोटींमध्ये)
२०२१-२२ ४.६१
२०२२-२३ ६.८
२०२३-२४ ११.८७
२०२४-२५ १४.७८
२०२५-२६ २०.५८
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.