मुंबई

उधवा–तलासरी रस्त्यावर एकेरी वाहतूक;

CD

२०० मीटरसाठी अर्धा तास
उधवा-तलासरी रस्त्यावर एकेरी वाहतुकीचा फटका
तलासरी, ता. ७ (बातमीदार) ः उधवा-तलासरी राज्य मार्गावर सुरू असलेल्या काँक्रीटीकरणाच्या कामामुळे सध्या एकेरी वाहतूक सुरू आहे. त्यामुळे अवघ्या २०० मीटरचे अंतर पार करण्यासाठी तब्बल अर्धा तास लागत असल्याने वाहनचालक, नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
तलासरीतील मुख्य बाजारपेठेत रस्त्याचे काम सुरू असल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दुकाने असल्यामुळे वाहतुकीवर ताण वाढला आहे. काम करताना ठेकेदाराकडून कोणतेही योग्य नियोजन करण्यात आले नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. परिणामी वाहतूक कोंडीबरोबरच बाजारपेठेत येणाऱ्या ग्राहकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
------------------------------
रुग्णवाहिका अडकली
तलासरी ग्रामीण रुग्णालयात जाणारी रुग्णवाहिका शनिवारी (ता. ४) सकाळी वाहतूक कोंडीत अडकली होती. या वेळी रुग्णवाहिकेत गरोदर महिला असल्याने चालकाने सायरन वाजवत मार्ग मिळवण्यासाठी प्रयत्न केले. अखेर स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेत रुग्णवाहिकेला मार्ग मोकळा करून दिल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.
---------------------------
सुरक्षा योजनांचा अभाव
अनेक ठिकाणी रस्ता खोदण्यात आला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना नसल्याने सूचना फलक, विभाजक, बॅरिकेट्स तसेच रात्री वाहनचालकांना दिशादर्शक फलकांची व्यवस्था नसल्याने गैरसोय होत आहे. खोदकामामुळे परिसरातील धुळीमुळे श्वसनासंबंधित आजार वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Kolhapur Hockey Player : अवघ्या २३ वर्षीय राज्यस्तरीय हॉकीपटूने घेतला गळफास, उपचारासाठी प्रयत्न केले पण...

अंकिता वालावलकरच्या आंब्याच्या पेट्या चोरीला; यूपीच्या कुरिअरवाल्याने पळवलं सामान; इतक्या हजारांचं नुकसान

Latest Marathi News Live Update : श्री संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्यांची शिकार प्रकरण उघड; 6 आरोपी ताब्यात

Pimpri Chinchwad News : महापालिकेच्या मल्टिस्पेशालिटी रुग्णालयांमुळे रुग्णांना कमी खर्चात मिळतात उत्तम उपचार

Pakistan Lockdown: आज रात्रीपासून पाकिस्तानमध्ये लॉकडाऊन! पंतप्रधान शहबाज शरीफ यांची घोषणा

SCROLL FOR NEXT