मुंबई

भोंदू बाबांविरोधात कम्युनिस्ट पक्षाचे आंदोलन

CD

भोंदूबाबांविरोधात कम्युनिस्ट पक्षाचे आंदोलन

कासा, ता. ७ (बातमीदार) : राज्यात उघड झालेल्या भोंदूबाबांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर डहाणू तालुक्यात भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने मंगळवारी (ता. ७) सागर नाका येथे आंदोलन करण्यात आले. भोंदूबाबांकडून महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांचा तीव्र निषेध करीत संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी या वेळी करण्यात आली.

अलीकडे नाशिकसह राज्यातील विविध ठिकाणी भोंदूबाबांकडून महिलांची फसवणूक, लैंगिक शोषण व नोकरीच्या प्रलोभनाने अत्याचार केल्याच्या घटना समोर येत आहेत. या घटनांमुळे राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, समाजातील सुजाण नागरिकांनी याबाबत जागरूक होणे गरजेचे असल्याचे आंदोलनकर्त्यांनी नमूद केले आहे. भोंदूबाबांच्या नावाखाली सुरू असलेल्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी शासनाने तत्काळ कठोर पावले उचलावीत, तसेच अशा बाबांना पाठबळ देणाऱ्यांचीही सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली.

याबाबत आमदार विनोद निकोले यांनी सांगितले, की सध्याचे आंदोलन हे प्रतीकात्मक असून, संबंधितांवर लवकरात लवकर कारवाई झाली नाही, तर संपूर्ण जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. या वेळी कम्युनिस्ट पक्षाचे तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिला कार्यकर्त्या लहानी दौडा यांनीही या वेळी भोंदूबाबांच्या कृत्यांचा निषेध व्यक्त केला. या वेळी कॉम्रेड रामदास सुतार, चंद्रकांत गोरखाना आणि इतर कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पेट्रोल-डिझेल दरवाढ, तुटवड्याने शेतकरी अडचणीत; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जागतिक संकट अन् मागणीही वाढलीय

MI vs RR: आधी आऊट, मग नो बॉल अन् चौकार... जडेजाने शार्दुल ठाकूरची भर मैदानात उडवली खिल्ली! Video होतोय Viral

Sangli Advocate Death : 'माझ्या मृत्यूला कोणालाही...'; मरण्यापूर्वी 27 वर्षीय वकिलाने चिठ्ठीत काय लिहिलं? सांगलीतील घटनेने खळबळ

आश्रम ३ मधील इंटीमेट सीनवर पहिल्यांदाच बोलला बॉबी देओल, म्हणाला, 'मी फार घाबरलो होतो'

विधानपरिषदेआधी काँग्रेसला धक्का? ७० नगरसेवक नॉट रिचेबल; राज्यात खळबळ

SCROLL FOR NEXT