घरकुलांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू
कासा, ता. ७ (बातमीदार) ः डहाणू नगर परिषद हद्दीतील नागरिकांसाठी प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० अंतर्गत नवीन घरकुल मंजुरीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र लाभार्थ्यांनी शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करावी, असे आवाहन नगर परिषदेकडून करण्यात आले आहे.
या योजनेअंतर्गत स्वतःच्या जागेवर घर बांधण्यासाठी ‘बीएलसी’ घटकांतर्गत अर्ज करता येणार आहे. त्यासाठी जागेच्या मालकीचे पुरावे (सातबारा, खरेदीखत किंवा मालमत्तापत्रक), चालू वर्षाचा उत्पन्न दाखला, मोबाईल क्रमांकाशी जोडलेले आधार कार्ड, कुटुंबातील सदस्यांचे आधार कार्ड, शिधापत्रिका, घरपत्रक उतारा तसेच मागील तीन वर्षांच्या मालमत्ता कराच्या पावत्या सादर कराव्यात, असे आवाहन नगर परिषदेकडून करण्यात आले आहे.