मुंबई

कल्याण रेल्वे स्थानकात लोकग्राम पुलाचे ''कनेक्शन'' अद्याप प्रतीक्षेत

CD

कल्याण रेल्वे स्थानकात पुलाचे काम अधांतरी
कल्याण, ता. ७ (बातमीदार):
मध्य रेल्वेचे महत्त्वाचे जंक्शन असलेल्या कल्याण रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मात्र, एकीकडे स्थानकाचा कायापालट होत असतानाच, दुसरीकडे लोकग्राम परिसरातील रहिवाशांना नव्या पुलाच्या अपूर्ण कामामुळे अद्यापही मनस्ताप सहन करावा लागत आहे.

कल्याण रेल्वे स्थानकातील सातही फलाट सध्या दोन मुख्य पादचारी पुलांनी जोडलेले आहेत. प्रशासनाने लोकग्राम परिसरातील प्रवाशांच्या सोयीसाठी नवा पूल उभारला खरा, परंतु या पुलाला अद्याप कोणत्याही फलाटाची जोडणी देण्यात आलेली नाही. परिणामी, लोकग्राममधील प्रवाशांना या पुलाचा वापर करता येत नसून, त्यांना जुन्याच लांबच्या मार्गाचा अवलंब करावा लागत आहे. यामुळे स्थानिकांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे.

आधुनिक सुविधांचा प्रवाशांना लाभ
लोकग्राम पुलाचा प्रश्न प्रलंबित असला तरी, स्थानकातील अंतर्गत सुविधांबाबत प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. फलाट क्रमांक २, ३ आणि ६, ७ वर लिफ्टची व्यवस्था असल्याने ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांची मोठी सोय झाली आहे. तसेच प्रत्येक फलाटावर सरकत्या जिन्यांमुळे गर्दीचे नियोजन करणे सोपे झाले आहे. स्थानकातून बाहेर पडण्यासाठी मुबलक मार्ग उपलब्ध असल्याने चेंगराचेंगरीच्या घटना टळल्या आहेत.

स्कायवॉकचा आधार
कल्याण पश्चिमेसह पूर्वेकडील कोळसेवाडी आणि सिद्धार्थ नगरला जोडणाऱ्या स्कायवॉकमुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मात्र, हे अंतर अर्धा ते पाऊण किलोमीटरचे असल्याने प्रवाशांची मोठी दमछाक होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सरकारचं हेच महागाई नियंत्रणाचं सूत्र, शरद पवारांचा गॅस दरवाढीवरून टोला; शेवटी इशाराही दिला

26/11 वेळी 20 गरोदर महिलांचे प्राण वाचवणारी ती परिचारिका कोण ? कंगनाने साकारलीय भूमिका

Photos : 1000 वर्षे जुनी प्राचीन शिलालेखांची कलाकृती सापडली; काळाच्या ओघात दडलेला 7व्या- 8व्या शतकाचा इतिहास, फोटो व्हायरल

Latest Marathi News Live Update : नवनीत राणा यांना राष्ट्रवादी काँग्रेस कडून उमेदवारी नाही

Mumbai: मुंबईत लाइव्ह कॉन्सर्टमध्ये तरुणाचा संशयास्पद मृत्यू, मित्र-मैत्रिणींसोबत मद्यपान केले अन्...; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT