भिवंडीत आज २४ तास पाणीपुरवठा बंद
भिवंडी, ता. ७ (वार्ताहर) : महापालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या ‘स्टेम वॉटर डिस्ट्रीब्युशन कंपनी’मार्फत पावसाळापूर्व तातडीची देखभाल आणि दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत. या कामासाठी बुधवारी (ता. ८) सकाळी ९ वाजेपासून ते गुरुवारी (ता. ९) सकाळी ९ वाजेपर्यंत असा एकूण २४ तासांचा ‘शटडाऊन’ घेण्यात येणार आहे.
शटडाऊनमुळे बुधवारी शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील. तसेच, गुरुवारी सकाळी ९ वाजता पुरवठा सुरू झाल्यानंतरही पुढील संपूर्ण दिवस पाणी कमी दाबाने आणि कमी प्रमाणात मिळण्याची शक्यता आहे. भिवंडी महापालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप पटणावर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
नागरिकांना आवाहन
पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने नागरिकांनी आदल्या दिवशीच पुरेसा पाणीसाठा करून ठेवावा आणि उपलब्ध पाणी जपून वापरावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. विशेषतः उंच सखल भागात पाणी पोहोचण्यास उशीर होऊ शकतो, याची नोंद घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.