मुंबई

स्थायी समितीच्या बैठकीत विकासकामांचा धडाका

CD

वाशी, ता. ७ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक बुधवारी (ता. ८) पालिका सभागृहात होणार असून या बैठकीत तब्बल ४१ विकासकामांचे प्रस्ताव मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात येणार आहेत. या प्रस्तावांचा खर्च एकूण सुमारे ८४ कोटी असून, स्थायी समितीची मंजुरी मिळाल्यानंतर शहरातील विविध विकासकामांना वेग मिळणार आहे.

नवी मुंबई महापालिकेवर मागील जवळपास सहा वर्षे प्रशासकीय कारभार होता; मात्र आता स्थायी समिती अस्तित्वात आल्यानंतर समितीने अंदाजपत्रक मंजूर केल्यानंतर आता सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवले आहे. त्यानंतर आता स्थायी समितीचे सभापती अशोक पाटील यांच्याकडून पहिल्यांदाच बैठक पार पडणार असून मंजुरी मिळाल्यानंतर या कामांना गती देण्याचा प्रयत्न सुरू होणार आहे. या प्रस्तावांमध्ये ऐरोली, वाशी, तुर्भे, नेरूळ, घणसोली, बेलापूर आदी परिसरांतील रस्ते, गटार, पदपथ, शाळा दुरुस्ती, आरोग्य सुविधा आणि सार्वजनिक ठिकाणांच्या सुधारणांचा समावेश आहे.

स्थायी समितीच्या या बैठकीत मंजुरी मिळाल्यास नवी मुंबईतील पायाभूत सुविधा अधिक सक्षम होण्यास मदत होणार असून नागरिकांच्या दैनंदिन जीवनातही मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


- वाशी विभागातील सेक्टर १६ येथे एमटीएनएल गेट ते विभाग कार्यालयापर्यंत गटार व पदपथ दुरुस्ती, सेक्टर सात व सेक्टर सहामधील प्रमुख रस्त्यांचे सुधारणा काम, तसेच सेक्टर दोनमध्ये डांबरीकरणाचे काम हाती घेतले जाणार आहे. याशिवाय सेक्टर नऊमधील जॉगिंग ट्रॅक परिसरात पदपथ सुधारणा केली जाणार आहे.
- तुर्भे विभागात मध्यवर्ती स्मशानभूमी ते सेक्टर १९ मधील मयुरेश रुग्णालयापर्यंत रस्त्याचे सुधारणा काम, तसेच तुर्भे गावातील ड्रेनेज व पदपथ सुधारणा प्रस्तावित आहेत.
- नेरूळ सेक्टर २० रेल्वे स्थानक परिसरात पदपथ सुधारणा करण्यात येणार आहे. नगररचना विभागांतर्गत महापालिकेच्या मुख्यालयातील विविध विभागांमध्ये संगणक सुविधा व अंतर्गत सजावट (वॉलपेपर) बसविणे, जुन्या उद्‍घाटन फलकांचे नूतनीकरण यांसारखी कामेही प्रस्तावित आहेत.

आरोग्य, शैक्षणिक सुविधांवर भर
- शैक्षणिक सुविधांमध्ये शाळा क्रमांक २० व ७८ मध्ये रंगरंगोटी व दुरुस्ती, तसेच दरावे येथील शाळेचे स्ट्रक्चरल मजबुतीकरण केले जाणार आहे. आरोग्य क्षेत्रात घणसोली सेक्टर सात येथे नवीन नागरी आरोग्य केंद्र उभारण्याचा प्रस्ताव आहे.
- बेलापूर गावातील मुख्य प्रवेशद्वार व डीमार्टकडे जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण, वाशीतील सेंटर वन मॉल परिसरातील मलनिस्सारण वाहिनी बदलणे, वंडर्स पार्कमध्ये सुधारणा, तसेच घनकचरा प्रक्रिया प्रकल्पांच्या देखभाल-दुरुस्तीची कामेही हाती घेतली जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Rice Export : तणावातही भारतीय तांदळाला इराणमध्ये मागणी; युद्धजन्य परिस्थितीवर मात करत उलाढाल, ६५ लाख टन निर्यातीचा अंदाज

MS Dhoni Fitness: धोनीला तंदुरुस्त होण्यास किती वेळ लागेल सांगणे अवघड, ब्रेव्हिस...; CSK च्या ताफ्यातून धक्कादायक बातमी समोर

Pune Shirur crime News: शिरूरमध्ये मातृत्वाला काळिमा; दुसऱ्या लग्नात अडथळा ठरणाऱ्या ११ महिन्याच्या यशचा खून करून विहिरीत टाकल्याची कबुली

SCROLL FOR NEXT