... तर ग्रामस्थांचा पुन्हा आंदोलनाचा इशारा
मोखाडा, ता. ७ (बातमीदार) : सायदे-जोगलवाडी ग्रामपंचायत हद्दीतील जलजीवन मिशन योजनेंतर्गत नळपाणी पुरवठा योजना अर्धवट अवस्थेत आहे. त्यामुळे येथील नऊ गाव-पाड्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. नळयोजनेबाबत येथील ग्रामस्थांनी यापूर्वी वाघ्याचीवाडी येथील पाण्याच्या टाकीखाली आंदोलन केले होते. त्या वेळी पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांना मार्चअखेर नळयोजना पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. त्याची पूर्तता न झाल्याने येथील ग्रामस्थांनी गुरुवारी (ता. ९) पुन्हा पाण्याच्या टाकीखाली उभे राहून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
मोखाडा तालुक्यात जलजीवन मिशन योजनेंतर्गतच्या नळपाणी पुरवठा योजनांचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. सायदे-जोगलवाडी येथील नळयोजनेचे काम ही अर्धवट अवस्थेत आहेत. त्या वेळी येथील ग्रामस्थांना पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागत आहे. त्यामुळे ऐन रखरखत्या उन्हात येथील महिलांना हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लागते आहे.
नळयोजनेचे काम पूर्ण करून पाणीटंचाई दूर करावी, यासाठी येथील ग्रामस्थांनी २७ फेब्रुवारीला जलजीवन मिशन योजनेच्या पाण्याच्या टाकीखाली एकदिवसीय आंदोलन केले होते. या वेळी पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांनी सदरचे काम ३१ मार्चअखेर पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. मात्र, सदरचे काम आजही त्याच स्थितीत असल्याने, ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी पुन्हा आंदोलनाचे हत्यार ऊपसले आहे. त्यांनी गुरुवारी पुन्हा जलजीवन मिशन योजनेंतर्गत बांधलेल्या पाण्याच्या टाकीखाली एकत्र येऊन पाणीपुरवठा विभागाचा निषेध नोंदवत आंदोलन करणार असल्याचे निवेदन गटविकास अधिकारी यांना दिले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.