मुंबई

खालापुरात माती माफीयावर कारवाईचा बडगा. पाचपट ओव्हरलोड वाहतूक.

CD

खालापुरात मातीमाफियांवर कारवाईचा बडगा
खालापूर (बातमीदार) ः मातीची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या माफियांविरोधात खालापूर महसूल विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. मंडल अधिकारी सचिन वाघ यांच्या पथकाने सोमवारी (ता. ७) दोन डम्पर ताब्यात घेतले असून, त्यांना पाच लाख १९ हजार ५२० रुपयांचा दंड ठोठावला आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात उत्खनन होत असून, डम्परमधून बेकायदा माती वाहतूक होत असल्याच्या तक्रारी तहसील कार्यालयाला प्राप्त झाल्या होत्या. या अनुषंगाने सचिन वाघ यांनी ओव्हरलोड दोन डम्पर पकडले असून, तपासणी केली असता पाचपट अधिक माती असल्याचे निष्पन्न झाले. दोन्ही डम्पर जप्त करून तहसील कार्यालयाच्या आवारात उभे केले आहेत. शासनाचे रॉयल्टी आणि इतर आवश्यक परवानगी याची तपासणी करण्यात येत असून, त्यानुसार दंड ठरवल्याची माहिती मंडळ अधिकारी सचिन वाघ यांनी दिली. महसूल विभागाच्या कारवाईने मातीमाफियांचे धाबे दणाणले असून, वावोशी भागात कारवाईसत्र सुरू राहणार असल्याची माहिती महसूल विभागाकडून मिळाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार-खून प्रकरणात सुनावणीला वेग; आरोपीचा शोध घेणाऱ्या दोन महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंद

IMD Alert : जून-जुलैमध्येही उष्णतेची लाट कायम राहणार; माॅन्सून श्रीलंकेवरच रेंगाळला, 7 दिवसांत केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता, आयएमडीचा नवा अंदाज काय?

SCROLL FOR NEXT