मुंबई

कर्जतच्या अंबेमाता मंदिर चोरीप्रकरणी आरोपी अटकेत;

CD

अंबेमाता मंदिरातील चोरीप्रकरणी आरोपी अटकेत
कर्जत (बातमीदार) ः शहरातील अंबेमाता मंदिरात झालेल्या चोरीप्रकरणी पोलिसांनी अवघ्या आठ दिवसांत आरोपीला अटक करत गुन्ह्याचा छडा लावला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व कर्जत पोलिस ठाण्याच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.
या प्रकरणात दीपक उर्फ गणेश भुक्तर (वय ३५, रा. मुंबई) याला सोमवारी (ता. ६) अटक करण्यात आली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
दीपकने (ता. २८) मंदिराच्या खिडकीचे ग्रील वाकवून आत प्रवेश केला होता. त्यानंतर दानपेटीचे कुलूप तोडून अंदाजे १५ ते २० हजार रुपये लंपास केले. तसेच मंदिरालगत राहणाऱ्या पुजारी आशा गौर यांच्या घरातूनही सुमारे पाच हजार रुपये चोरीस गेले होते. या घटनेत एकूण सुमारे २५ हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेला होता. याप्रकरणी कर्जत पोलिस ठाण्यात विविध कलमांअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानुसार सीसीटीव्ही कॅमेरे बंद असतानाही पोलिसांनी गुप्त माहिती व तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचा माग काढत त्याला अटक करण्यात यश मिळवले. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले जात आहे. मंदिरातील चोरीचे भावनिक गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि कर्जत पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपीला अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार-खून प्रकरणात सुनावणीला वेग; आरोपीचा शोध घेणाऱ्या दोन महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंद

SCROLL FOR NEXT