मुंबई

डंपरखाली चिरडून चिमुकलीचा मृत्‍यू

CD

डम्परखाली चिरडून चिमुकलीचा मृत्‍यू
मालाड, ता. ७ (बातमीदार) ः चारकोप गणेशनगर, मणिहार चाळ येथे राहणाऱ्या सहा वर्षांच्या चिमुकलीचा डम्परखाली आल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज (ता. ७) दुपारी घडली. शाळेतून घरी परतत असताना तिचा अपघात झाल्‍याचे समोर आले.
घटनेनंतर तातडीने चिमुकलीला पालिकेच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघाती गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास सुरू आहे. संबंधित डम्पर हा एका विकसकाचा असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
मृत मुलगी चारकोप गणेशनगर येथील मणिहार चाळ येथे वास्तव्यास होती. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
या दुर्घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून, संबंधित डम्परचालकावर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

कठोर कारवाई करा
स्थानिक सर्वपक्षीय नेत्यांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. पोलिस उपायुक्तांना पत्र देऊन सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात
आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Rice Export : तणावातही भारतीय तांदळाला इराणमध्ये मागणी; युद्धजन्य परिस्थितीवर मात करत उलाढाल, ६५ लाख टन निर्यातीचा अंदाज

MS Dhoni Fitness: धोनीला तंदुरुस्त होण्यास किती वेळ लागेल सांगणे अवघड, ब्रेव्हिस...; CSK च्या ताफ्यातून धक्कादायक बातमी समोर

Pune Shirur crime News: शिरूरमध्ये मातृत्वाला काळिमा; दुसऱ्या लग्नात अडथळा ठरणाऱ्या ११ महिन्याच्या यशचा खून करून विहिरीत टाकल्याची कबुली

SCROLL FOR NEXT