मुंबई

दीक्षितची न्यावैद्यक चाचणी कालिनालाच होणार

CD

दीक्षितची न्यावैद्यक चाचणी कालिनात
नौकानयन महासंचालनालयाला पार्थिव सोपवण्याचे न्यायालयाचे आदेश

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ :  ओमानच्या किनाऱ्याजवळ मार्चमध्ये व्यापारी जहाजावर झालेल्या संशयित हल्ल्यात मृत्यू झालेला खलाशी दीक्षित सोलंकीच्या पार्थिवाची न्यायवैद्यक चाचणी कालिना येथील प्रयोगशाळेत करण्याचे आदेश मंगळवारी (ता. ७) उच्च न्यायालयाने नौकानयन महासंचालनालयाला (डीडीजीपी) दिले.

संबंधित पार्थिव दीक्षितचे आहे, हे ओळखायचे कसे? अशी विचारणा दीक्षितच्या कुटुंबीयांनी मागील सुनावणीवेळी न्यायालयात केली होती. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी त्यांनी  डीएनए चाचणीची मागणीही केली होती. त्याची दखल घेऊन न्यायालयाने नौकानयन महासंचालनालयाकडे स्पष्टीकरण मागवले होते. त्या पार्श्वभूमीवर, मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली खडंपीठासमोर मंगळवारी सुनावणी झाली.  त्या वेळी पुढील कार्यवाहीसाठी डीजी शिपिंगकडून सोमवारी रात्रीच महाराष्ट्र पोलिस महासंचालक, मुंबई पोलिस आयुक्त आणि हैदराबाद व मुंबई येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेला पत्रव्यवहार करण्यात आल्याची माहिती केंद्र सरकार, डीजी शिपिंग आणि डीडीजी शिपिंगच्या वतीने वकील रुई रॉड्रिग्ज यांनी न्यायालयाला दिली. त्याची दखल घेऊन खंडपीठाने डीडीजी शिपिंगला पार्थिव ताब्यात घेऊन कालिना येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्याचे आदेश दिले.
त्याच वेळी डीएनए विश्लेषण अहवाल सादर करण्यासाठी न्यायालयाने एक निश्चित कालमर्यादा ठरवून देण्याची विनंती कुटुंबीयांकडून वकील प्रज्ञा तळेकर यांनी केली. मात्र, अशा प्रकारचा आदेश देणे न्यायालयाला शक्य नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट करून याचिका निकाली काढली.
पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ओमानच्या किनाऱ्याजवळ ‘एमटी एमकेडी व्योम’ या तेलवाहू जहाजावर ड्रोनने मार्च महिन्यात धडक दिली. या भीषण स्फोटात कांदिवली येथे राहणाऱ्या दीक्षित सोलंकीचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह परत मिळावा म्हणून दीक्षितचे वडील अमृतलाल सोलंकी आणि बहीण मितालीने न्यायालयात याचिका केली होती. रविवारी (ता. ५) त्याचे पार्थिव भारतात पोहोचले; परंतु ते भारतात परत आणण्याची प्रक्रिया हाताळणाऱ्या कंपनीने कुटुंबीयांना आधी तक्रार आणि डीएनए चाचणी करून घेण्यास सांगितले. दुसरीकडे, भारतात आलेले पार्थिव पूर्ण नूसन तुकड्यात असल्यामुळे अंत्यसंस्कारासाठी पार्थिव याचिकाकर्त्यांच्या ताब्यात देण्यापूर्वी त्याची डीएनए चाचणी करणे आवश्यक असल्याची माहिती वकील प्रज्ञा तळेकर यांनी न्यायालयाला दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: युवा जोश, उडवली मुंबईची झोप! यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी यांची दे दणादण फटकेबाजी; ११ षटकांत १५० धावा...

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

Rice Export : तणावातही भारतीय तांदळाला इराणमध्ये मागणी; युद्धजन्य परिस्थितीवर मात करत उलाढाल, ६५ लाख टन निर्यातीचा अंदाज

SCROLL FOR NEXT