मुंबई

ऐना–बोईसर मार्गाची दुरवस्था

CD

ऐना-बोईसर मार्गाची दुरवस्था
खड्ड्यांमुळे अपघातांचा धोका वाढला

तारापूर, ता. ७ (बातमीदार) : डहाणू तालुक्यातील ऐना-बोईसर मुख्य मार्गाची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून मोठमोठ्या खड्ड्यांमुळे हा रस्ता वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहे. दररोज हजारो कामगार या मार्गाने बोईसर औद्योगिक परिसरात ये-जा करतात; मात्र खराब रस्त्यामुळे त्यांचा प्रवास जीवघेणा बनला असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

निकणे, रानशेत, वधना, ऐना, रणकोळ, साखरे, उर्से, साये, दाभोण या गावांतील नागरिक मोठ्या प्रमाणावर या मार्गाचा वापर करतात. रस्त्यावर पडलेल्या खोल खड्ड्यांमुळे दुचाकी, चारचाकी तसेच अवजड वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी वाहनांचे नुकसान होत असून अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. काही दिवसांपूर्वी याच मार्गावर बसच्या धडकेत दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने परिस्थितीचे गांभीर्य अधिकच वाढले आहे. याशिवाय कालव्याचे पाणी थेट रस्त्यावर येत असल्याने डांबरीकरण उखडून खड्ड्यांची समस्या अधिक तीव्र झाली आहे. पाण्याखाली लपलेले खड्डे अपघातांना निमंत्रण देत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. याबाबत प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता मनीष चकधरे यांनी सांगितले, की या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली असून लवकरच रस्त्यावरील खड्डे भरून दुरुस्तीचे काम हाती घेतले जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Rice Export : तणावातही भारतीय तांदळाला इराणमध्ये मागणी; युद्धजन्य परिस्थितीवर मात करत उलाढाल, ६५ लाख टन निर्यातीचा अंदाज

MS Dhoni Fitness: धोनीला तंदुरुस्त होण्यास किती वेळ लागेल सांगणे अवघड, ब्रेव्हिस...; CSK च्या ताफ्यातून धक्कादायक बातमी समोर

Pune Shirur crime News: शिरूरमध्ये मातृत्वाला काळिमा; दुसऱ्या लग्नात अडथळा ठरणाऱ्या ११ महिन्याच्या यशचा खून करून विहिरीत टाकल्याची कबुली

SCROLL FOR NEXT